राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान पट्टनामथिट्टा जिल्ह्यातील प्रमादम स्टेडियमवर एक मोठी दुर्घटना होता-होता टळली आहे. राष्ट्रपतींना घेऊन आलेल्या वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने ज्या हेलिपॅडवर यशस्वीरित्या लँडिंग केले, त्या हेलिपॅडचा काही भाग अचानक खचला. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही आणि राष्ट्रपती सुरक्षित होत्या. मात्र, हेलिपॅड खचल्यामुळे हेलिकॉप्टरचे चाक त्यात अडकले. यामुळे काही काळ धावपळ उडाली आणि सुरक्षेतील त्रुटी समोर आली. (President Draupadi Murmu)
(हेही वाचा –Delhi Pollution : श्वास कोंडला! दिवाळीनंतर प्रदूषणाचा विळखा कायम; हवा ‘अतिगंभीर’ श्रेणीत )
#WATCH | Kerala: A portion of the helipad tarmac sank in after a chopper carrying President Droupdi Murmu landed at Pramadam Stadium. Police and fire department personnel deployed at the spot physically pushed the helicopter out of the sunken spot. pic.twitter.com/QDmf28PqIb
— ANI (@ANI) October 22, 2025
वजन पेलले नाही?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) सबरीमला येथील भगवान अयप्पा मंदिरात दर्शनासाठी पत्तनामथिट्टा येथे आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, प्रमादम स्टेडियममधील हेलिपॅडचे बांधकाम नुकतेच करण्यात आले होते. वायूसेनेच्या हेलिकॉप्टरच्या प्रचंड वजनामुळे, सिमेंटचे ताजे बांधकाम असलेला हा हेलिपॅडचा भाग अचानक खाली खचला. यामुळे हेलिकॉप्टरचा एक भाग खचलेल्या जमिनीमध्ये अडकला, ज्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.
तातडीने बचावकार्य
अपघात घडल्याचे लक्षात येताच तत्काळ सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस दल आणि अग्निशमन दलाच्या (Fire Force) कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कोणतीही मोठी यंत्रणा येण्याची वाट न पाहता तातडीने मदतकार्य सुरू केले. कर्मचाऱ्यांनी आपल्या हातांनी हेलिकॉप्टरला (Helicopter) ढकलत खचलेल्या भागातून ते सुरक्षित ठिकाणी हलवले. या घटनेचा व्हिडिओ (Video) देखील समोर आला असून, कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
(हेही वाचा – Gold and Silver Rate: आनंदाची बातमी! गेल्या ७ दिवसात चांदीच्या दरात 33 हजारांची घसरण, तर सोन्याचा दर काय ?)
शेवटच्या क्षणी ठिकाण बदलले
प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर (helicopter accident) उतरवण्याचे ठिकाण शेवटच्या क्षणी बदलण्यात आले. मूळ नियोजनानुसार हेलिकॉप्टर निलाक्कल येथे उतरणार होते. मात्र, हवामानामुळे ते प्रमादम स्टेडियमवर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे तातडीने तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडचा काँक्रीट पूर्णपणे सुकला नव्हता आणि तो हेलिकॉप्टरचे वजन पेलू शकला नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी दर्शवते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community


