Gold and Silver Rate: आनंदाची बातमी! गेल्या ७ दिवसात चांदीच्या दरात 33 हजारांची घसरण, तर सोन्याचा दर काय ?

Gold and Silver Rate: आनंदाची बातमी! गेल्या ७ दिवसात चांदीच्या दरात 33 हजारांची घसरण, तर सोन्याचा दर काय ?

258
Gold Silver Rate Today
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा उसळी; आजचे दर काय?

गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात (Gold and Silver Rate) सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतच आहे. वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? असा प्रश्न खरेदीदारांच्या समोर निर्माण होत आहे. कारण वाढत्या दरामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठा झळ बसत आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. (Gold and Silver Rate)

हेही वाचा-Donald Trump यांनी व्हाइट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी!

दोन लाखांच्या (Gold and Silver Rate) घरात पोहोचलेल्या चांदीचे भाव सात दिवसांत तब्बल ३३ हजार रुपयांनी घसरले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, मंगळवारी तर चांदीच्या भावात आठ हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी एक लाख ६२ हजार रुपयांवर आली. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाववाढ होत गेलेल्या चांदीने १४ ऑक्टोबर रोजी १ लाख ९५ हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर मात्र, चांदीचे भाव उतरत आहेत. (Gold and Silver Rate)

हेही वाचा- Heavy Rain: ऐन दिवाळीत अवकाळी पावसाचा तडाखा! पुढील 3 ते 4 दिवस महत्त्वाचे

चांदीच्या भावात घसरण होत असताना सोन्याच्या भावात मात्र वाढ होत आहे. मंगळवारी सोन्याच्या भावात ६०० रुपयांची वाढ होऊन ते प्रतितोळा १ लाख ३२ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष 2025मध्ये सोन्याचा भाव तब्बल 50 टक्क्यांपेक्षा अधिक किमतीने वाढलेला आहे. सध्या सोन्याचा भाव हा 4000 डॉलर्स प्रतिऔंसच्या पुढे गेला आहे. सोन्याने आतापर्यंत 35 वेळा ऐतिहासिक तेजी गाठलेली आहे. (Gold and Silver Rate)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.