मरीन ड्राईव्ह येथील एका हॉटेलच्या इमारतीला आग; व्हिडीओ व्हायरल

पहाटे हॅप्पी स्ट्रीट उपक्रमासाठी येथे जमलेल्या लोकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य टिपायला सुरुवात केली.

126
मरीन ड्राईव्हयेथील एका हॉटेलच्या इमारतीला आग; व्हिडीओ व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत कुठेनाकुठेतरी आगीचे प्रकार घडत आहेत. अशातच मरीन ड्राईव्ह येथील एका हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.

मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मरीन ड्राईव्ह येथील ट्रायडंट हॉटेलच्या (Hotel Trident Fire) इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावरून धुराचे लोट पाहायला मिळाले. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रायडंट हॉटेलच्या इमारतीच्या टेरेसवरून धुराचे लोट बाहेर पडताना दिसून आले.

(हेही वाचा – Ajit Doval : नेताजी असते तर देशाची फाळणी झाली नसती – अजित डोवाल)

माहितीनुसार, रविवारी (१८ जून) पहाटे ६:५० ते ७:१० च्या दरम्यान मरीन लाईन्सवरील हॉटेल ट्रायडेंटच्या टेरेसवर मजल्यावरून काळा धूर यायला सुरुवात झाली. रविवार असल्याने मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग अॅक्टिव्हीटीसाठी नागरिक जमले होते. पहाटे हॅप्पी स्ट्रीट उपक्रमासाठी येथे जमलेल्या लोकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य टिपायला सुरुवात केली. मात्र काही वेळात हा धूर येणं थांबल्याने नक्की ट्रायडेंटमध्ये काय झालं होतं याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हेही पहा

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.