State Level Competition Tournament : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासह ‘या’ ५ शहरांमध्ये आठव्या राज्यस्तरीय ‘मोडी लिपी स्पर्धा २०२४’चे आयोजन

या स्पर्धा १ मे २०२४ या महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीच्या दिवशी घेतल्या जातील. २९ एप्रिलपर्यंत आगाऊ नोंदणी आवश्यक आहे.

132
State Level Competition Tournament: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासह 'या' ५ शहरांमध्ये आठव्या राज्यस्तरीय 'मोडी लिपी स्पर्धा २०२४'चे आयोजन
State Level Competition Tournament: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासह 'या' ५ शहरांमध्ये आठव्या राज्यस्तरीय 'मोडी लिपी स्पर्धा २०२४'चे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती (State Level Competition Tournament) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या ५ शहरांमध्ये मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि कोल्हापूर येथे एकाच दिवशी आणि एकाच वेळी ‘सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा’ आणि ‘शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा’ घेतली जाणार आहे. मोडी लिपी प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य स्पर्धांचे हे आठवे वर्ष आहे.

या स्पर्धा १ मे २०२४ या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी घेतल्या जातील. २९ एप्रिलपर्यंत आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. सर्वच केंद्रांवरील दोन्ही स्पर्धा गटातील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. (World Modi Lipi Prasar Samiti)

मोडी लिपी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 
१. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, वीर सावरकर मार्ग, दादर, शिवाजी पार्क, मुंबई ४०००२८ राजेश खिलारी ९३२३०२२२२३/०२२-२४४६५८७७
२. पुणे संपर्क – संदीप कान्हेरे ९८९०६००७०८, परेश जोशी ९८८११०४३७९
३. अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालय, संपर्क – संतोष यादव ९३७२१५५४५५
४. कोल्हापूर, नाईट कॉलेज, संपर्क – नवीनकुमार माळी ९४२००३९४९४,
५. नाशिक केंद्र, संपर्क – अरविंद साने ९८५०७४६१७२

स्पर्धेचे नियम 
– प्रवेशपत्र स्पर्धा केंद्रावरच भरायचे आहेत. ऑनलाईन प्रवेशपत्र भरण्याची मुभा नाही.
– दूर अंतरावर रहाणारे स्पर्धेच्याच दिवशी अर्धा तास आधी येऊन प्रवेशपत्र भरू शकतील.
– पुस्तक विक्रेत्यांनाही मोडीविषयक पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यास आवाहन करण्यात आले आहे.

सूचना 
– स्पर्धकांनी स्वत:चे पेन, बोरू, टाक, पेन्सिल, खोडरबर, फूट पट्टी आणि धरावयास पॅड आणावे.
– स्पर्धकांस कागद पुरवले जातील. काळ्या शाईचा वापर अनिवार्य आहे.
– सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धेकरिता देवनागरी लिपीत उतारा दिला जाईल. तो मोडी लिपीत लिहावयाचा आहे.
– अक्षर चुका ग्राह्य धरल्या जातील. शीघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धेकरिता १ पेशवेकालीन कागद असेल. याकरिता एक तास दिला जाईल.
– पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. स्पर्धा निकाल प्रक्रियेचे सर्व हक्क आयोजकांकडे राहतील.
– प्रवेश : एका स्पर्धेचे सहभाग शुल्क ₹१०० आहे, तर दोन्ही स्पर्धा मिळून सहभाग शुल्क ₹१५० आहे. अधिक माहितीकरिता दिलेल्या संबंधित क्रमांकावर संपर्क करावा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.