Pravin Darekar: मोदी, शहा, फडणवीस यांचा मत्सर हाच उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख अजेंडा – आमदार प्रविण दरेकर

मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या प्रश्नावर बोलताना दरेकर म्हणाले की, राज ठाकरे महायुतीत आले तर निश्चितच फायदा होईल. राज ठाकरे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नेते, चांगले वक्ते आहेत. उद्धव ठाकरेंना याचीच तिडीक आलीय.

127
Lok Sabha Election 2024: मोदी, शहा, फडणवीस यांचा मत्सर हाच उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख अजेंडा - आमदार प्रविण दरेकर

उद्धव ठाकरे यांच्या टीकांना मी राजकीय टीका मानत नाही. उद्धव ठाकरेंच्या पोटातील मळमळ बाहेर येतेय आणि त्यांच्या उलट्या त्यांना ठिकठिकाणी सभेतून होताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Prime Minister Narendra Modi) द्वेष त्यांच्या नसानसांत भरलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष, मत्सर हा ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख अजेंडा झालेला आहे, अशी टीका भाजपा विधान परिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. (Lok Sabha Election 2024)

पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, आमच्या तिन्ही पक्षांत समन्वय आहे. त्याच पद्धतीने मनसे आली तरी समन्वयाची भूमिका घेऊन तोडगा काढण्याची क्षमता भाजपात आहे. जागा आणि उमेदवारांपेक्षा या देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी व्हावेत. ते देशासाठी आणि पक्षासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आमच्यात कुठल्याही प्रकारचा तिढा असणार नाही. जे होईल ते समन्वयातून, सामोपचारातून होईल.

मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या प्रश्नावर बोलताना दरेकर म्हणाले की, राज ठाकरे महायुतीत आले तर निश्चितच फायदा होईल. राज ठाकरे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नेते, चांगले वक्ते आहेत. उद्धव ठाकरेंना याचीच तिडीक आलीय. कारण आतापर्यंत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार एकनाथ शिंदे घेऊन गेले. संपूर्ण शिवसेना शिंदेंसोबत गेली. उद्धव ठाकरे ठाकरे नावावर जी राजकीय मिजास करत होते ती राजकीय मिजास राज ठाकरे भाजपासोबत आल्यामुळे संपणार आहे. ज्या ठाकरे नावावर त्यांची कोल्हेकुई महाराष्ट्रभर चालू आहे ती राज ठाकरे यांच्यामुळे संपुष्टात येणार असल्याने ते विचलित झाले असल्याचा टोलाही दरेकरांनी लगावला.

(हेही वाचा – Lok Sabha Election : भाजपाचे प्रचार साहित्य; टी शर्ट, कॉफीमग, बिल्ला आणि बरेच काही.. )

संजय राऊत यांच्यावर टीका करताना दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांना कोणीतरी बदडले पाहिजे. एकदा जेलमधून जाऊन आलेत. त्यांना ते कर्तृत्व, धाडस वाटतेय. आपल्यावर काहीतरी कारवाई व्हावी यासाठी मला काहीतरी बोला असा त्यांचा अट्टाहास चालला आहे.आम्ही त्यांना किंमत देत नाही.

ठाकरेंच्या विधानांचा समाचार…
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानांचा समाचार घेताना दरेकर म्हणाले की, बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना विचारांसहित पूर्णपणे एकनाथ शिंदे भाजपसोबत घेऊन आले. त्यातून उद्धव ठाकरेंना पोटशूळ होतोय. उद्धव ठाकरे यांचा खताशी कधी संबंध आला आहे का? त्यांचा फक्त खाण्याशी संबंध आहे. त्यांनी पोती उघडून खत कधी पाहिले आहे का? नाहीतर अशा प्रकारचे वक्तव्यच त्यांनी केले नसते. शेणखत हे उत्तम खत आहे हे उद्धव ठाकरेंना कळत नाही का? शेतीतील माहिती नाही आणि शेतकऱ्यांचा पुळका दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. पंतप्रधान मोदी काय करताहेत हे संपूर्ण देश पाहतोय. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम मोदी करताहेत. नुसते पब्लिसिटीसाठी शिव्यांच्या लाखोल्या वाहायच्या या पलीकडे उद्धव ठाकरे काही करू शकत नाही. त्याचबरोबर आमशा पाडवी, रविंद्र वायकर सोडून गेले. तरी तुम्हाला अक्कल येणार नसेल तर काय बोलायचे. मर्दानगीच्या भाषा करायच्या, पळणारे नाही लढणारे आहोत बोलायचे. ईडीच्या नोटीसला घाबरत नाही बोलता मग तुमच्या माणसांना नोटीसा आल्या त्यांना संरक्षित करायची धमक तरी तुमच्यात आहे का? असा प्रश्नही दरेकरांनी (Pravin Darekar) विचारला.

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना औकात दिसेल
दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे शिवसेनेतून, महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून तडीपार झाले आहेत. संपूर्ण शिवसैनिकांनी, सर्व आमदार, खासदारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून, संघटनेच्या नेतृत्वापासून तडीपार केलेय. त्यामुळे स्वतःच आपल्या कार्यकर्त्यांकडून तडीपार झालेत त्यांनी मोदीच्या तडीपारीविषयी बोलावे यापेक्षा दुर्दैव दुसरे काही नाही. मोदींना देशातील जनता तडीपार करते की ४०० पार करून देशाचे नेतृत्व करण्याची तीनदा संधी देते हे निवडणुकीत दिसून येईल. तेव्हा उद्धव ठाकरेंना आपली औकात दिसून येईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.