महाराष्ट्रातील ८५.६६ लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत मिळणार १८६६.४० कोटी रुपये

170
महाराष्ट्रातील ८५.६६ लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत मिळणार १८६६.४० कोटी रुपये
महाराष्ट्रातील ८५.६६ लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत मिळणार १८६६.४० कोटी रुपये

महाराष्ट्रातील ८५.६६ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना १८६६.४० कोटी रुपयांचा लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार, २७ जुलै २०२३ रोजी देण्यात येणार आहे. हा निधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएमकिसान) योजनेतंर्गत त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जाईल.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी, केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरू केली असून, या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति हप्ता २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांसह प्रति वर्ष ६ हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PMKISAN) अंतर्गत देय असलेल्या चौदाव्या हप्त्याचा (एप्रिल, २०२३ ते जुलै, २०२३) लाभ देशातील लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते वितरित केला जाईल. खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा खरेदीसाठी ही रक्कम निश्चितच उपयुक्त ठरेल आणि कृषी उत्पादन वाढीला चालनाही मिळेल. फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून, ११०.५३ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण रु. २३७३१.८१/- कोटी लाभ हस्तांतरित झाला आहे.

(हेही वाचा – खतांचा काळाबाजार करणाऱ्यांना चाप; राज्य सरकारने उचलले ‘हे’ पाऊल)

महाराष्ट्र राज्यातील एकूण ८५.६६ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना १ एप्रिल २०२३ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीसाठी सीकर येथे होणाऱ्या समारंभात अंदाजे रु. १८६६.४०/- कोटी रुपयांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. केंद्र सरकारने या योजनेचा लाभ आधारशी जोडलेल्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ८८.९२ लाख लाभार्थ्यांची बँक खाती आधार लिंक्ड लाभांच्या रकमेसाठी नोंदणी करण्यात आली आहेत.

उर्वरित सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी संबंधित बँकेला भेट द्यावी आणि केंद्र सरकारच्या विनंतीनुसार पंतप्रधान किसान योजनेचे लाभ मिळविण्यासाठी आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेकडे आवश्यक अर्ज सादर करण्याचे सूचित केले आहे. या सोहळ्याला, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, मा. केंद्रीय रसायन व खते आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया उपस्थित राहणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.