कन्फर्म तिकीट गावना नाय? तर ही बातमी वाचा…

यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

124

गणेशोत्सव आणि कोकण यांचे नाते सर्वश्रुत आहे. मुंबई-पुण्यात नोकरीनिमित्ताने राहायला आलेला कोकणातील चाकरमानी वर्षातून गणेशोत्सवाला मात्र तो वेळ काढून जातोच. यंदा राज्यात गणेशोत्सवाच्या तोंडावरची कोरोना रुग्ण संख्या कमी आहे. त्यामुळे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे चाकरमान्यांनी ठरवले आहे. त्यासाठी रेल्वेनेही कोकणाकडे जाण्यासाठी विशेष  गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. मध्य रेल्वे ७२ गणपती स्पेशल गाड्या सोडणार आहे. या गाड्यांचे बुकींग सुरु झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

हे आहे जादा गाड्यांचे वेळापत्रक

सीएसएमटी ते सावंतवाडी रोड – दैनिक स्पेशल (३६ फेऱ्या)

  • ट्रेन क्र. ०१२२७ : ही ट्रेन दररोज ५ ते २२ सप्टेंबरदरम्यान दररोज सीएसएमटीहून रात्री १२.२० वा. सुटेल. तर दुपारी २.०० वा. सावंतवाडी रोडला पोहोचेल.
  • ट्रेन क्र. ०१२२८ : ही परतीच्या प्रवासाची ट्रेन ५ ते २२ सप्टेंबरदरम्यान दररोज सावंतवाडीहून दु. २.४० वा सुटेल. तर सीएसएमटीला पहाटे ४.३५ वा. पोहोचेल.
  • कुठे कुठे थांबणार – दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ

सीएसएमटी ते रत्नागिरी – द्विसाप्ताहिक (१० फेऱ्या)

  • ट्रेन क्र. ०१२२९ : ही ट्रेन ६ ते २० सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून दोनदा धावेल. सोमवार आणि शुक्रवार सीएसएमटीहून दुपारी १.१० वाजता सुटेल. तर रत्नागिरीला रात्री १०.३५ वा. पोहोचेल.
  • ट्रेन क्र. ०१२३० : ही परतीची ट्रेन ६ ते २० सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून दोनदा रविवार आणि गुरुवार धावणार आहे. ही ट्रेन रत्नागिरीहून रात्री ११.३० वाजता सुटेल. तर सीएसएमटीला सकाळी ८.२० वाजता पोहोचेल.
  • कुठे कुठे थांबणार : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी

(हेही वाचा : १६ हजार वीरांगणांच्या बलिदानाला ७१८ वर्षे पूर्ण! राणी पद्मिनीच्या पराक्रमाचे व्हावे स्मरण!)

पनवेल ते सावंतवाडी रोड – त्रैसाप्ताहिक (१६ फेऱ्या)

  • ट्रेन क्र. ०१२३१ : ही ट्रेन ७ ते २२ सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून तीनदा मंगळवार, बुधवार आणि शनिवारी असेल. ही ट्रेन पनवेलहून सकाळी ८.०० वाजता सुटून सावंतवाडीला रात्री ८.०० वा. पोहचेल.
  • ट्रेन क्र. ०१२३२ : ही परतीची ट्रेन ७ ते २२ सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून तीनदा मंगळवार, बुधवार आणि शनिवारी सुटेल. तर सावंतवाडीहून रा. ८.४५ वा. सुटून पनवेलला स. ७.१० वा. पोहचेल.
  • कुठे कुठे थांबणार : रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ

पनवेल ते रत्नागिरी – द्विसाप्ताहिक स्पेशल (१० फेऱ्या)

  • ट्रेन क्र. ०१२३३ : ही ट्रेन ९ ते २३ सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून दोनदा गुरुवार आणि रविवारी धावेल. तर पनवेलहून स. ८.०० वा. सुटून रत्नागिरीला दु. ३.४० वा. पोहोचेल.
  • ट्रेन क्र. ०१२३४ : ही परतीची ट्रेन ६ ते २० सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून दोनदा सोमवारी आणि शुक्रवारी असेल. ही ट्रेन रत्नागिरीहून रा. ११.३० वाजता सुटून पनवेलला स. ६.०० वा. पोहचेल.
  • कुठे कुठे थांबणार : रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रत्नागिरी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.