Charitable Hospitals Pune : गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळणे सोपे; पुणे येथील ५६ रुग्णालयांना नावापुढे ‘हा’ शब्द लावण्याचे निर्देश

249
Charitable Hospitals Pune : गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळणे सोपे; पुणे येथील ५६ रुग्णालयांना नावापुढे ‘हा’ शब्द लावण्याचे निर्देश
Charitable Hospitals Pune : गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळणे सोपे; पुणे येथील ५६ रुग्णालयांना नावापुढे ‘हा’ शब्द लावण्याचे निर्देश

पुणे शहरातील रुबी, जहांगीर, पुना रुग्णालय, संचेती रुग्णालय (Sancheti Hospital), सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Dinanath Mangeshkar Hospital), आदित्य बिर्ला रुग्णालय (Aditya Birla Hospital) ही सर्व रुग्णालये धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत येतात. (Charitable Hospitals Pune) मात्र हे रुग्णांना ठाऊक नसल्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील आणि विनामूल्य उपचारांच्या योजनेपासून वंचित रहातात. याची जाणीव ठेवून आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता, तसेच मुख्यमंत्री आणि धर्मादाय आयुक्त यांना पत्रव्यवहार करून वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे आता पुण्यातील ५६ धर्मादाय रुग्णालयांना ‘धर्मादाय’ हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly winter Session : राज्यात आत्मविश्वास गमावलेला विरोधीपक्ष; मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात)

चकचकीत रुग्णालयात धर्मादाय आहे, याची कल्पना अनेक रुग्णांना नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजने पासून वंचित राहतात. पुढील काळात असे होऊ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

उपचारांमध्ये 50 टक्के सवलत

आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये 50 टक्के सवलत, तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने 2003 मध्ये एका निकालाद्वारे केली आहे. राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे ‘धर्मादाय’ हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे कि नाही, याची माहिती होईल. वरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना उपचार घेता येईल. (Charitable Hospitals Pune)

(हेही वाचा – Mumbai ED Raid : दादर येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र शो रूम वर ईडीची छापेमारी)

निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे !

राज्यात एकूण ४३० धर्मादाय रुग्णालये असून त्याअंतर्गत १० टक्के खाटा या १ लाख ८० सहस्र वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी, तर आणखी १० टक्के खाटा या निर्धन ८५ सहस्र वार्षिक उत्पन्न असणार्‍या रुग्णांसाठी राखीव आहेत. (Charitable Hospitals Pune)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.