Megablock : हार्बर मार्गावर ३८ तासांचा मेगाब्लॉक; पनवेलकरांनी मुंबईला यायचे कसे ?

105
Megablock : हार्बर मार्गावर ३८ तासांचा मेगाब्लॉक; पनवेलकरांनी मुंबईला यायचे कसे ?
Megablock : हार्बर मार्गावर ३८ तासांचा मेगाब्लॉक; पनवेलकरांनी मुंबईला यायचे कसे ?

३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २ ऑक्टोबर दुपारी १ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. (Megablock) या कालावधीत तब्बल ३८ तास पनवेलहून हार्बर मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या आणि ट्रान्सहार्बर मार्गाने ठाणे येथे जाणाऱ्या सर्व ट्रेन बंद रहाणार आहेत. मालवाहतुकीसाठी बनवण्यात येणाऱ्या  ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामाने गती घेतली आहे. त्यामुळे हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परंतु या मेगाब्लॉकमुळे पनवेलकरांचे प्रचंड हाल होणार असून मुंबई आणि ठाणेच्या दिशेने येण्यासाठी लोकलचे कोणतेच पर्याय उपलब्ध नाहीत. या ब्लॉकमुळे बेलापूर – पनवेलदरम्यान एकही लोकल धावणार नाही. लोकलसेवेच्या या मेगाब्लॉकमुळे वाहनव्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे. (Megablock)

(हेही वाचा – Kidnapping Case : लालबागच्या राजाला नवस बोलता आला नाही म्हणून दीड महिन्याच्या मुलाचे अपहरण)

डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या २ नवीन अप आणि डाऊन मार्गिकांच्या बांधकामाबरोबरच पनवेल उपनगरीय रिमॉडेलिंगचे काम चालणार आहे. यावेळी ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसतील. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा बेलापूर, नेरूळ आणि वाशी स्थानकांवरून चालवण्यात येतील. ट्रान्सहार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा ठाणे आणि नेरूळ / वाशी स्थानकांदरम्यान धावतील. या कालावधीत बसचा पर्याय उपलब्ध असला, तरी त्या व्यवस्थेवरही ताण येणार आहे. (Megablock)

या कालावधीत जोडून सुट्ट्या असल्याने अनेक जण पर्यटनासाठी, खरेदीसाठी बाहेर पडतात. अशा वेळी लोकलसेवा बंद असल्याने मोठी गैरसोय होणार आहे. (Megablock)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.