Injured Govinda : मुंबईत ३५ गोविंदा जखमी, चार गोविंदा रुग्णालयात दाखल

३५ जखमी गोविंदांपेंकी केईएम आणि राजावाडी रुग्णालयात प्रत्येकी दोन गोविंदांना दाखल करून उपचार सुरु आहेत.

113
Injured Govinda : मुंबईत ३५ गोविंदा जखमी, चार गोविंदा रुग्णालयात दाखल
Injured Govinda : मुंबईत ३५ गोविंदा जखमी, चार गोविंदा रुग्णालयात दाखल

हजार आणि लाखो रुपयांचे बक्षिस जिंकण्याचा जिंकण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या उंचच उंच हंडी फोडण्याच्या प्रयत्नात अनेक ठिकाणी गोविंदा पडून जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. दुपारपर्यंत तब्बल ३५ गोविंदा हे किरकोळ तसेच गंभीर मार लागून जायबंदी झाले आहेत. या ३५ जखमी गोविंदांपेंकी केईएम आणि राजावाडी रुग्णालयात प्रत्येकी दोन गोविंदांना दाखल करून उपचार सुरु आहेत. तर २२ गोविंदांवर बाह्यरुग्ण कक्षात उपचार सुरु आहेत, तर ९ रुग्णांना उपचार करून सोडून देण्यात आली असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

मुंबईत गुरुवारी गोपाळकाल्याच्या दिवशी हंडी फोडण्यासाठी सज्ज झालेल्या गोविंदा पथकातील कुणा गोविंदाला दुखापत झाल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करता यावे यासाठी महापालिकेच्या प्रत्येक रुगणालयात प्रत्येकी ५ ते १० रुग्ण खाटा राखीव ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार केईएम, शीव, नायर, कुपर यासह १६ उपनगरीय रुग्णालय तसेच शासनाच्या जे जे, सेंट जॉर्ज, पोद्दार, जी टी रुग्णालय यासह हिंदुजा, जसलोक, बॉम्बे, रहेजा, नानावटी आदी खासगी रुग्णालयांमध्येही खाटा राखीव ठेवून जखमी गोविंदांवर तातडीने उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

त्यानुसार गुरुवारी हंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचत उभारलेल्या थर कोसळून काही पथकांमधील जवान जखमी झाले. त्यामुळे या जखमी जवानांना तातडीने जवळच्या महापालिका, शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत होते. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत या सर्व रुग्णालयांमध्ये एकूण ३५ जखमी गोविंदांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची नोंद झाली आहे. यामध्ये केईएम रुग्णालयात सर्वाधिक १६ जखमी गोविंदा दाखल झाले. त्यापैंकी १४ रुग्णांवर ओपीडीत उपचार सुरु आहेत तर २ गोविंदा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर पूर्व उपनगरातील राजावाडी रुग्णालयात ३ जखमी गोविंदा दाखल झाले. पैंकी १ गोविंदावर उपचार करून सोडून देण्यात आले तर दोन गोविंदांवर पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे. शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसामान्य महापालिका रुग्णालयात सात जखमी गोविंदांना दाखल करण्यात आले असून त्यासर्वांवर ओपीडीमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली आहे.

(हेही वाचा – Mangesh Kadam In Shiv Sena : अशोक चव्हाणांना धक्का; नांदेडचे काँग्रेस शहराध्यक्ष मंगेश कदम यांचा शिवसेनेत प्रवेश)

उपचार सुर असलेल्या आणि उपचार करून सोडलेल्या गोविंदांची संख्या

केईएम रुग्णालय : एकूण १६ (०२ दाखल, १४ उपचार सुरु)

नायर रुग्णालय : एकूण ०१ (०१ उपचार करून सोडले)

जे जे हॉस्पिटल : एकूण ०२ (०१ उपचार करून सोडले, एकावर उपचार सुरु)

जीटी रुग्णालय : एकूण ०१ (उपचार करून सोडले)

पोद्दार रुग्णालय : एकूण ०१ (उपचार करून सोडले)

व्ही एन देसाई रुग्णालय : एकूण ०२ (उपचार करून सोडले)

कुपर रुग्णालय : एकूण ०२ (उपचार करून सोडले)

राजावाडी रुग्णालय : एकूण ०३ (२ दाखल, १ उपचार करून सोडले)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.