Mangesh Kadam In Shiv Sena : अशोक चव्हाणांना धक्का; नांदेडचे काँग्रेस शहराध्यक्ष मंगेश कदम यांचा शिवसेनेत प्रवेश

कदम यांचा शिवसेनाप्रवेश हा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना धक्का मानला जात आहे.

106
Mangesh Kadam In Shiv Sena : अशोक चव्हाणांना धक्का; नांदेडचे काँग्रेस शहराध्यक्ष मंगेश कदम यांचा शिवसेनेत प्रवेश
Mangesh Kadam In Shiv Sena : अशोक चव्हाणांना धक्का; नांदेडचे काँग्रेस शहराध्यक्ष मंगेश कदम यांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेस पक्षाचे नांदेड शहराध्यक्ष आणि मागासवर्गीय विभाग विकास काँग्रेस कमिटीचे सदस्य मंगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. नांदेडचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पुढाकाराने गुरुवारी रात्री हा पक्षप्रवेश पार पडला. कदम यांचा शिवसेनाप्रवेश हा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना धक्का मानला जात आहे.

मंगेश कदम यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि नांदेडमधील माजी स्थायी समिती सदस्य ज्योती कदम, अॅड. धम्मपाल कदम, विकास गायकवाड, प्रवीण वाघमारे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मंगेश कदम हे नांदेड जिल्हा परिषदेचे काँग्रेस पक्षाचे सहा वेळा नगरसेवक होते. तर त्यांच्या पत्नी ह्या माजी समिती सदस्य होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित झाल्यामुळे आणि काँग्रेस पक्षाने आपला वापर करून नंतर आपल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे मत यावेळी कदम यांनी व्यक्त केले.

(हेही वाचा – Rain Alert : दहीहंडी आणि गणेशोत्सव खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी पावसाची स्थिती जाणून घ्या; हवामान खात्याने वर्तवले अंदाज)

कलानगर येथील मुस्लिम महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

वांद्रे पूर्व येथील भारत नगर, कला नगर, बिकेसी येथील मुस्लिम बांधव आणि भगिनींनी स्थानिक नेते सलिम जफर शेख यांच्या पुढाकाराने शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी काही मुस्लिम महिलांनी लोकांसाठी काम करणारे ‘लोकनाथ’ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनगटावर राखी बांधली. सर्व धर्मांचा सन्मान करणारा पक्ष म्हणजे शिवसेना असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानंतर बोलताना व्यक्त केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.