जी-२० शिखर परिषदेच्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर ३१ कोटींची विद्युत रोषणाई

128
जी-२० शिखर परिषदेच्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर ३१ कोटींची विद्युत रोषणाई
जी-२० शिखर परिषदेच्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर ३१ कोटींची विद्युत रोषणाई

सचिन धानजी, मुंबई

मुंबईमध्ये जी-२० शिखर परिषदेसाठी विविध कार्यगटांची शिष्टमंडळे येणार असून येत्या मंगळवारी या परिषदेच्या आपत्ती सौम्यीकरण कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत २३ ते २५ मे २०२३ या कालावधीमध्ये होत आहे. या शिखर परिषदेसाठी उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी मुंबईतील अनेक  भिंतींची रंगरंगोटीसह विविध भागांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. या अंतर्गत या पाहुण्यांचे स्वागत होणाऱ्या शहरांसह उपनगरांमधील प्रमुख रस्ते तसेच द्रुतगती महामार्गांवरील झाडांवर विशेषत: विद्युत रोषणाई करण्यात येणार असून या विद्युत रोषणाईवरच तब्बल २९ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

जी-२० शिखर परिषदेसाठी मुंबई शहर व उपनगरातील विविध महत्वाच्या आणि द्रुतगती मार्गिकेवरील झाडांवर सुशोभीकरणासाठी एलईडी लाईटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विविध करांसह तब्बल ३१.३८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या एलईडी लाईट बसवण्यासाठी मेसर्स एएससी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांमध्ये द्रुतगती महामार्गासह प्रमुख रस्त्यांवरील झाडांवर ही विद्युत रोषणाई करण्या येणार आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी जी-२० शिखर परिषदेच्या दृष्टीकोनातून मुंबईतील सुशोभीकरणाच्या कामाबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत झाडांवर बसवण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईमध्ये प्रामुख्याने हिरव्या रंगाचा एलईडी लाईटचा वापर करण्याचे निर्देश दिले होते. या विद्युत रोषणाईमध्ये बिघाड झाल्यानंतर २४ ते ४८ तासांमध्ये दुरुस्ती न झाल्यास त्यांना प्रत्येक दिवशी दोन हजारांचा दंड असेल तर बिघडलेले एलईडी लाईट न बदल्यास  प्रति आठवडा दहा हजारांचा दंड असेल असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – …तर दादरच्या पदपथ होतील फेरीवालामुक्त!)

विशेष म्हणजे मुंबई सुशाभीकरण प्रकल्पांतर्गत प्रत्येक विभाग कार्यालयाच्यावतीने विद्युत रोषणाईची कामे हाती घेण्यात आली असून यापूर्वीच अशाप्रकारच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले असताना जी २० शिखर परिषदेच्या नावाखालील महत्वाच्या रस्त्यावरील झाडांवर विद्युत रोषणाई करण्यासाठी सुमारे ३१ कोटी रुपयांचा खर्च का असा सवाल उपस्थित होत आहे. हा खर्च मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत प्रत्येक विभाग कार्यालयांच्या माध्यमातून करताना या रस्त्यांचा समावेश का केला नाही असाही सवाल उपस्थित होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.