महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी २९९ वाहने; ई वाहनांऐवजी डिझेलच्या गाड्या घेणार भाडेतत्वावर

219
महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी २९९ वाहने; ई वाहनांऐवजी डिझेलच्या गाड्या घेणार भाडेतत्वावर

मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांना दैनंदिन कामांसाठी टुरिस्ट परमिटधारक बिनवातानुकूलित गाड्या भाडेतत्वावर घेतल्या जात असून प्रत्येक महापालिका परिमंडळांमध्ये प्रत्येकी ४३ वाहने याप्रमाणे २९९ वाहने भाडेतत्वावर घेतली जाणर आहे. यापूर्वी २७३ वाहने भाडेतत्वावर घेतली जात होती, त्यातुलनेत या वाहनांमध्ये वाढ करून २९९ वाहने भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. सहा महिन्यांसाठी घेण्यात येणाऱ्या वाहनांसाठी विविध करांसह ८ कोटी २२ लाख ८० हजार रुपये मोजले जाणार आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे ई वाहने वापरणे बंधनकारक आहे, तरीही अशा प्रकारची ई वाहने नसल्याने पुन्हा डीझेल वापराच्या वाहनांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या विभागांसाठी विवध विभागांच्या वापरासाठी ग्रुप एक ते ग्रुप सात या ग्रुपनिहाय १००० सीसी व त्यापेक्षा अधिक क्षमता असलेल्या टूरिस्ट परमिटधारक गाड्या भाड्याने घेण्यात येणार आहे. यामध्ये पाच ग्रुप मध्ये प्रत्येकी ४३ आणि दोन ग्रुपमध्ये प्रत्येकी ४२ वाहने भाडेतत्वावर घेण्यात येणार असून यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये सात ग्रुपसाठी स्वतंत्र संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक वाहनांसाठी प्रति दिन ४४ हजार १०० रुपये एवढी रक्कम मोजली जाणार आहे.

(हेही वाचा – निधी वाटपातील दुजाभाव हा लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य जनतेवर अन्याय – अंबादास दानवे)

यापूर्वी मुंबई महापालिकेने २७३ वाहने २०२१ मध्ये भाडेतत्त्वावर घेतली होती. या एक वर्षाच्या कंत्राट कामाला प्रथम सहा महिने आणि त्यानंतर एक वर्ष असे दीड वर्षांची मुदत वाढवून दिली होती. त्यानंतर आता यासाठी नवीन निविदा मागवल्या आहेत.

शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरे ह्या विभागांतील विविध विभागांना त्यांच्या कार्यालयीन दैनंदिन कामांसाठी पर्सनल करिअर गाड्या पुरविण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. दिनांक २९ डिसेंबर २०२१ च्या शासन निर्णया नुसार ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण- २०२१’ जाहीर करण्यात आले आहे. या शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०२२ पासून शासकीय वापरासाठी भाडेतत्वावर घेण्यात येणारी सर्व वाहने ही बॅटरी इलेक्ट्रिक असतील. टूरिस्ट परमिटधारक बॅटरी इलेक्ट्रिक कार सदृश्य वाहनांची उपलब्धता तपासून घेण्यासाठी या वाहनांच्या नोंदणी विषयी प्रादेशिक परिवहन कार्यालय ताडदेव, अंधेरी, बोरिवली, वडाळा व ठाणे येथे चौकशी केली असता, प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणीकृत टूरिस्ट परमिटधारक बॅटरी इलेक्ट्रिक कार सदृश्य वाहनांची संख्या अगदीच नगण्य असल्याचे आढळले, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगकरिता ‘चार्जिंग स्टेशन्स’ची पायाभूत सुविधाही सर्व ठिकाणी सध्या उपलब्ध नसल्याने टूरिस्ट परमिटधारक बॅटरी इलेक्ट्रिक कार सदृश्य वाहनांची सध्याची उपलब्धता आणि वाहनांच्या चार्जिंगकरिता आवश्यक चार्जिंग स्टेशन्सची सद्यस्थितीतील पायाभूत सुविधांची व्यवस्था पाहता, ह्यासाठी अजून काही कालावधी लागण्याचे अपेक्षित असल्याने केवळ सहा महिन्यांकरता ही वाहने भाडेतत्त्वावर घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.. टूरिस्ट परमिटधारक बॅटरी इलेक्ट्रिक कार सदृश्य पुरेशी वाहने भाडेतत्वावर पुरविण्याकरिता उपलब्ध करून देण्यास कंत्राटदारालाही पुरेसा कालावधी (मोबिलाइजेशन पिरियड) देणे, आवश्यक असल्याने ही वाहने सहा महिन्यांकरता घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ग्रुप १

वाहनांची संख्या : ४३
वाहनांसाठी येणारा एक वर्षांचा खर्च : १ कोटी १८लाख ३२ हजार ९१२
वाहन पुरवणारी संस्था : अंबाजी ट्रॅव्हल्स

ग्रुप२

वाहनांची संख्या : ४३
वाहनांसाठी येणारा एक वर्षांचा खर्च : १ कोटी १८लाख ३२ हजार ९१२
वाहन पुरवणारी संस्था : नेहा ट्रेडींग कंपनी

ग्रुप ३

वाहनांची संख्या : ४२
वाहनांसाठी येणारा एक वर्षांचा खर्च : १ कोटी १५लाख ५७ हजार ७२८
वाहन पुरवणारी संस्था : जो एंटरप्रायझेस

ग्रुप ४

वाहनांची संख्या : ४२
वाहनांसाठी येणारा एक वर्षांचा खर्च : १ कोटी ११ लाख १३ हजार २००
वाहन पुरवणारी संस्था : झेनिक्स एंटरप्रायझेस

ग्रुप ५

वाहनांची संख्या : ४३
वाहनांसाठी येणारा एक वर्षांचा खर्च : १ कोटी १८लाख ३२ हजार ९१२
वाहन पुरवणारी संस्था : श्री पार्श्व लॉजिस्टिक

ग्रुप ६

वाहनांची संख्या : ४३
वाहनांसाठी येणारा एक वर्षांचा खर्च : १ कोटी १८लाख ३२ हजार ९१२
वाहन पुरवणारी संस्था : श्री पार्श्व लॉजिस्टिक

ग्रुप ७

वाहनांची संख्या : ४३
वाहनांसाठी येणारा एक वर्षांचा खर्च : १ कोटी १८लाख ३२ हजार ९१२
वाहन पुरवणारी संस्था : आकार ट्रॅव्हल्स

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.