राज्यात ६०५ इलेक्ट्रिक वाहनांवर कारवाई

56

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बेकायदा बदल करणा-यांविरोधात राज्य परिवहन विभागाने बडगा उगारला आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यभरात 2 हजार 238 ई-बाईक्सची तपासणी करत 605 इलेक्ट्रिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय दोषी वाहन चालकांकडून 5 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.

605 वाहने दोषी

मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-वाहनांची विक्री होत असल्याने, मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना आणि रस्ते अपघातांची शक्यता परिवहन विभागाने व्यक्त केली. त्यामुळे आता ई-वाहनांची विशेष तपासणी केली जात आहे. 23 ते 25 मेदरम्यान राज्यभरातील 50 आरटीओ कार्यालयांनी 2 हजार 238 ई- बाईक्सची तपासणी केली. त्यामध्ये 605 वाहने दोषी आढळून आली. ई- वाहने विक्री करणा-या 274 वितरकांच्या दुकानांत आरटीओ कर्मचा-यांनी भेट देऊन तपासणी केली.

( हेही वाचा Indian bank SO Recruitment 2022 : इंडियन बॅंकेत 300 हून अधिक पदांची भरती; असा करा अर्ज )

प्रमाणपत्राशिवाय ई-बाईक्सची विक्री

आतापर्यंत राज्यात 66 हजार 482 इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1981 च्या नियम 2 (4) मध्ये बॅटरी ऑपरेटेड व्हेईकलची व्याख्या दिली असून, 250 वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच वाहनांची वेगमर्यादा ताशी 25 किलोमीटरपेक्षा कमी आहे, अशा ई-बाईक्सना नोंदणीपासून सूट आहे. मात्र, काही वाहन उत्पादक मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-बाईक्सची विक्री करतात. बेकायदेशीर बदल करुन अशा वाहनांची बॅटरी क्षमता 250 वॅटपेक्षा जास्त करतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.