Fog In Delhi : उत्तर भारतातील शहरे गारठली; धुक्यामुळे दिल्लीत १३४ विमाने लेट

Fog In Delhi : उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. अनेक भागांमध्ये तापमान किमान उणे तीन अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. धुक्यामुळे शहरांमध्ये दृश्यमानता कमी झाली आहे.

158
Fog In Delhi : उत्तर भारतातील शहरे गारठली; धुक्यामुळे दिल्लीत १३४ विमाने लेट
Fog In Delhi : उत्तर भारतातील शहरे गारठली; धुक्यामुळे दिल्लीत १३४ विमाने लेट

दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi-NCR) दाट धुके पसरले आहे. प्रशासनाने धुक्याबाबत रेड अलर्टही जारी केला आहे. यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग प्रभावित झाले आहेत. दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) १३४ विमानांच्या लॅंडिंगला उशीर झाला. नवीन पायलट्सना धुक्याचा अनुभव नसल्याने रनवे कुठे आहे, हेच त्यांना कळत नव्हते. सावधगिरी म्हणून ६० विमाने दिल्लीऐवजी दुसऱ्याच शहरात उतरवण्यात आली. (Fog In Delhi)

(हेही वाचा – Dr. Mohan Bhagwat : व्यक्तीप्रमाणेच देशाचेही चारित्र्य असते)

उत्तर भारतात थंडीची लाट

या परिसरात २२ रेल्वे ८ ते १० तास उशिराने धावत होत्या. २८ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता सफदरजंगमध्ये ५० मीटर व पालममध्ये २५ मीटर दृश्यमानता नोंदवण्यात आली.

उत्तर भारतात (North India) थंडीची लाट पसरली आहे. काश्मीरच्या अनेक भागांमध्ये तापमान किमान उणे तीन अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये मात्र सकाळी धुके कायम होते. श्रीनगरमध्ये (Srinagar) किमान तापमान उणे ३.३ अंश, गुलमर्ग (Gulmarg) येथे उणे २.६, काझीगुंड (Qazigund) येथे उणे ३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

(हेही वाचा – Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराची सजावट ‘त्रेतायुगा’वर आधारित, संकुलात बांधली जाणार ७ मंदिरे; अनोख्या संकल्पनेविषयी वाचा सविस्तर)

रस्ते अपघातात १७ जणांनी गमवावा जीव

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) ३२ जिल्ह्यांमध्ये धुक्याचा रेड अलर्ट आहे. या शहरांमध्ये दृश्यमानता कमी झाली आहे. काही शहरांमध्ये सकाळच्या वेळी शून्य दृश्यमानता असते, तर काही ठिकाणी ती ५-१० मीटरपर्यंत पोहोचली आहे. ५ जिल्ह्यांतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी मध्यप्रदेशातील ६ शहरांमध्ये गारपिटीची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांत उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), राजस्थान (Rajasthan) आणि पंजाबमध्ये (Punjab) धुक्यामुळे रस्ते अपघाताचे प्रसंगही घडले आहेत. त्यांत १७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. (Fog In Delhi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.