हरियाणातील गुरुग्राम पोलिसांनी शहरातील विविध भागांतून १३ बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi Infiltrators) ताब्यात घेतले. ही कारवाई डीसीपी क्राईम, हुतेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सेक्टर ३९ च्या गुन्हे शाखेच्या पथकाने केली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जाईल.
पोलिसांनी संवेदनशील भागांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवली, तसेच बांधकाम सुरू असलेली ठिकाणे, झोपडपट्ट्या आणि इतर संशयास्पद ठिकाणी कागदपत्रांची कसून तपासणी केली. तपासादरम्यान, १३ जणांकडे वैध भारतीय रहिवासी कागदपत्रे नसल्याचे आढळून आले, तसेच त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिकत्वाशी (Bangladeshi Infiltrators) संबंधित कागदपत्रेही सापडली. चौकशीदरम्यान, आरोपींनी खुलासा केला की, ते बांगलादेशातील एजंटांच्या मदतीने कालियागंज सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात घुसले होते आणि मजूर म्हणून वेश बदलून विविध ठिकाणी राहत होते. गुरुग्राममध्ये त्यांना आश्रय आणि रोजगार कोण पुरवत होते, याचा तपास पोलीस आता करत आहेत.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्धची मोहीम सुरूच राहील आणि झोपडपट्ट्या, भाड्याची घरे, पीजी, औद्योगिक क्षेत्रे, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये तपासणी अधिक तीव्र केली जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वैध कागदपत्रे असलेल्या रहिवाशांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांनी लोकांना संशयास्पद हालचालींची माहिती ११२ वर देण्याचे आवाहन केले आहे. (Bangladeshi Infiltrators)
Join Our WhatsApp Community

