Shri Ram : आंध्र प्रदेशात उभारणार श्रीरामाची १०८ फूट उंच मूर्ती

89

अयोध्येतील भव्य राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होत असताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्वात उंच श्रीरामांची मूर्ती उभारण्याची घोषणा केली. ही मूर्ती नंद्याल जिल्ह्यातील मंत्रालयाम गावात उभारली जाणार आहे. आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये भगवान श्रीरामाच्या मूर्तीसाठी ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

तुंगभद्रा नदीच्या काठावरील मंत्रालयम गावात ही मूर्ती उभारली जाईल आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी हिंदू धर्माचे प्रतिबिंब म्हणून याकडे पाहिले जाईल. केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर वैष्णव परंपरेला विशेष चालना देण्याचे साधन म्हणूनही याकडे पाहिले जाईल. १० एकरांमध्ये पसरलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडीच वर्षांत पूर्ण होणार आहे. या स्थानाला ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण हे विजयनगर साम्राज्याचे जन्मस्थान होते, ज्याने “स्वदेश आणि स्वधर्म” च्या आदर्शांचे समर्थन करून शौर्याने दक्षिणेकडील प्रदेशांवर पुन्हा हक्क मिळवला.

(हेही वाचा Ajmer Kand : चित्रपट प्रदर्शित करू दिला नाही, तर ‘यु-ट्यूब’वर करू ! – दिग्दर्शक सचिन कदम)

आंध्र प्रदेशातील, मंत्रालयममध्ये भगवान श्रीरामाच्या पुतळ्याच्या पायाभरणी कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी, आंध्रामध्ये चालू असलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. या उपक्रमांमध्ये गृहनिर्माण, अन्न दानम (अन्नदान), प्राणदानम (अवयव दान), विद्यादान (शिक्षण दान), पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि गोरक्षण यांचा समावेश आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचे कार्य हातात घेतल्याबदल शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मंदिराची पायाभरणी झाली आणि लवकरच प्रभू श्री रामांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार असून, शेकडो वर्षांनंतर प्रभू श्री राम पुन्हा त्यांच्या योग्य ठिकाणी निवास करणार आहेत, असेही शाह म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.