Chembur Park मध्ये बहरणार ‘नागरी वन’ : ४८ देशी प्रजातींच्‍या १० हजार २६४ रोपांची होणार लागवड

रोपांच्या लागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी २८ ऑगस्‍ट रोजी अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

190
Chembur Park मध्ये बहरणार 'नागरी वन' : ४८ देशी प्रजातींच्‍या १० हजार २६४ रोपांची होणार लागवड
Chembur Park मध्ये बहरणार 'नागरी वन' : ४८ देशी प्रजातींच्‍या १० हजार २६४ रोपांची होणार लागवड

एम पश्चिम विभागातील चेंबूर (पूर्व) येथे म्‍हैसूर कॉलनी परिसरातील शरद नारायण आचार्य उद्यानामध्‍ये आयआयएफएल फाऊंडेशन संस्थेच्या सामाजिक दायित्व अर्थात सीएसआर निधीतून दोन हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रामध्ये ४८ देशी प्रजातीच्या १० हजार २६४ रोपांची लागवड करण्यात येत आहे. एम पश्चिम विभागातील चेंबूर (पूर्व) येथे म्‍हैसूर कॉलनी परिसरातील शरद नारायण आचार्य उद्यानामध्‍ये आयआयएफएल फाऊंडेशन संस्थेच्या सामाजिक दायित्व अर्थात सीएसआर निधीतून दोन हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रामध्ये करण्यात येणाऱ्या रोपांच्या लागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी २८ ऑगस्‍ट २०२३ अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

New Project 60 2

 

या प्रसंगी बोलतांना भिडे यांनी, मुंबईतील पर्यावरणाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी मुंबई महानगरपालिका विविध स्तरीय पर्यावरण पूरक उपाययोजना सातत्याने राबवित असल्याचे सांगितले. याच उपाययोजनांचा भाग म्हणून मुंबईत विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने मियावाकी पद्धतीच्या नागरी वनांची लागवड करण्‍यात येत आहे. मुंबईकरांना अव्याहतपणे प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची जोपासना करण्‍याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असे प्रतिपादन भिडे यांनी केले. मुंबईतील अधिकाधिक नागरी वने ही ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’ अर्थात ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’-सीएसआरच्‍या माध्‍यमातून फुलविण्‍यासाठी संस्‍था-संघटनांनी पुढे यावे, असे आवाहनही भिडे यांनी केले.

New Project 59 2

(हेही वाचा – Mission Aditya L-1 : २ सप्टेंबर रोजी होणार लॉन्च)

शालेय विद्यार्थी हे उद्याचे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे घटक

शालेय विद्यार्थी हे उद्याचे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे घटक असल्याने या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी महानगरपालिका शाळांमधील २५ विद्यार्थ्यांच्या हस्तेही रोप लागवड करण्यात आली. याप्रसंगी उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी, एम पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, आयआयएफएल फाऊंडेशनच्‍या संचालक मधू जैन आणि इतर मान्‍यवर यावेळी उपस्थित होते. हरित क्षेत्रात वाढ होण्यासह पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. या अंतर्गत नागरी वनांची निर्मिती करण्‍यावर भर दिला जात असल्याचे प्रशासनाच्यावतीने महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

New Project 61 2

उद्यानात या रोपांची होणार लागवड

चेंबूर येथील शरद नारायण आचार्य उद्यानात सोमवारी करण्‍यात आलेल्‍या वृक्षारोपणात देशी प्रजातींच्‍या वृक्षांचा म्‍हणजेच फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणाऱ्या वृक्षांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सीताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरु, बदाम, रिठा, शीसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.