New Model Sankranthi Muggulu : संक्रांती मुग्गुलू म्हणजेच यावर्षी खास संक्रांतीसाठी कोणती रांगोळी काढाल?

संक्रांत हा खरंतर कापणीचा सण आहे आणि कापणी झाल्यामुळे शेतकर्‍यांना पैसेही मिळतात, त्यामुळे हा आनंदोत्सव आहे.

132
New Model Sankranthi Muggulu : संक्रांती मुग्गुलू म्हणजेच यावर्षी खास संक्रांतीसाठी कोणती रांगोळी काढाल?

संक्रांतीची विशेष रांगोळी ज्यास संक्रांती मुग्गुलू किंवा पोंगल कोलम म्हणूनही ओळखले जाते. संक्रांत हा खरंतर कापणीचा सण आहे आणि कापणी झाल्यामुळे शेतकर्‍यांना पैसेही मिळतात, त्यामुळे हा आनंदोत्सव आहे. असा खास दिवशी घराच्या दारात सुंदर रांगोळी काढली जाते. आता तुम्हाला माहितीय का? रांगोळीला अल्पना म्हणतत. मोहंजदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या खुणांमध्येही अल्पना चिन्ह आढळली आहेत. ही एक अतिप्राचीन लोककला आहे. (New Model Sankranthi Muggulu)

रांगोळीची कला खूपच प्राचीन आहे. रांगोळीचा उल्लेख आर्य युगातही आढळतो. लक्षात घ्या, रांगोळी म्हणजे समृद्धीचे प्रतीक, सकारात्मकतेची उर्जा… (New Model Sankranthi Muggulu)

ठिपके असलेले संक्रांती मुग्गुलू :

तुम्ही संक्रांतीला ठिपक्यांची रांगोळी काढू शकता. ११ x ६ ठिपक्यांद्वारे ही रांगोळी काढता येते. या रांगोळीचा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहू शकता आणि त्याप्रमाणे रांगोळी काढू शकता. (New Model Sankranthi Muggulu)

(हेही वाचा – ‘मी काय बघते, यापेक्षा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, Chitra Wagh यांचा अंधारेंना सवाल)

मोराची डिझाइन असलेली रांगोळी :

मयूर मुग्गुलू म्हणजेच मोराच्या डिझाइनची रांगोळी तुम्ही घराच्या बाहेर काढली तर शुभ मानले जाते. मोर हा रंगबेरंगी असतो. या रांगोळीमुळे तुमचे अंगण आकर्षक दिसेल. (New Model Sankranthi Muggulu)

खडूने काढा रांगोळी : 

काही लोकांना व्यवस्थित रांगोळी काढता येत नाही. अशा वेळी खडूने रांगोळीचं चित्र काढायचं आणि मग त्यात रंग भरायचे. संक्रांतीला पुष्कळ कामे असल्यामुळे पारंपारिक पद्धतीने रांगोळी काढायला वेळ मिळत नाही. अशा वेळी हा उपाय नक्कीच करुन बघा. (New Model Sankranthi Muggulu)

फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी :

रांगोळीमध्ये आकर्षकपणा जोडायचा असेल तर आम्ही तुम्हाला एक जबरदस्त कल्पना सुचवतोय. वर म्हटल्याप्रमाणे खडूने रांगोळी काढायची आणि त्यात रंग भरण्याऐवजी विविध फुलांच्या पाकळ्या भरायच्या. ही रांगोळीही पुष्कळ आकर्षक आणि वेगळी दिसते. (New Model Sankranthi Muggulu)

चैत्रांगण रांगोळी : 

चैत्र महिन्यात शुद्ध तृतीयेपासून अक्षय्य तृतीयेपर्यंत काढणार्‍या रांगोळीला चैत्रांगण रांगोळी असे म्हणतात. या रांगोळीमध्ये ३३ प्रतीकांचा समावेश असतो. ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन गौरी, दोन्ही बाजूंना सूर्य आणि चंद्र, दोन समया, दोन पाट, त्याखाली शंख, चक्र, गदा, गोपद्म, पाळणा, फळं, नारळ, गोमाता यांचा समावेश असतो. (New Model Sankranthi Muggulu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.