Baramati च्या निमित्ताने Pawar कुटुंबाची कटुता चव्हाट्यावर येणार?

150
Baramati च्या निमित्ताने Pawar कुटुंबाची कटुता चव्हाट्यावर येणार?
Baramati च्या निमित्ताने Pawar कुटुंबाची कटुता चव्हाट्यावर येणार?

सुजित महामुलकर

राज्यातील राजकारणात एक वेगळा ठसा उमटवणारे कुटुंब म्हणजेच पवार (Pawar) कुटुंब, ज्यांनी आजपर्यंत राजकारण आणि कुटुंब (family) याची सरमिसळ कधी केली नाही. (Baramati) त्या कुटुंबात यापुढे कटुता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कौटुंबिक नातेसंबंध-मैत्री आणि राजकारण या दोन भिन्न गोष्टी वेगळ्या ठेवण्याची संस्कृती आजपर्यंत महाराष्ट्रातील राजकारण्यांनी जपली. मात्र यापुढे कुटुंब, मैत्री आणि राजकीय वैमनस्य हे तराजूच्या एकाच पारड्यात दिसेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.(Baramati)

मैत्री आणि राजकारण

वैयक्तिक मैत्री, कौटुंबिक नाती आणि राजकारण वेगळे ठेवल्याची कला असलेली अनेक उदाहरणे राज्याने पहिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची राजकीय दिशा वेगळी असली तरी यांची चांगली मैत्री होती. (Baramati) राजकिय व्यासपीठावरून ते एकमेकांवर टीका-टिप्पणी करत पण राजकारणापलिकडे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अशाचप्रकारे दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख (Deshmukh) आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Munde) यांचीही मैत्री सर्वश्रुत आहे.(Baramati)

राजकारण वरचढ?

गेल्या काही वर्षात मैत्री सोडा, (Baramati) राजकरणामुळे कौटुंबिक संबंधातही वितुष्ट निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले (Bhosale), उद्धव आणि राज ठाकरे (Thackeray), पंकजा आणि धनंजय मुंडे (Munde) अशा प्रातिनिधिक उदाहरणांचा विचार करता अनेक नात्यांमध्ये राजकारण वरचढ ठरल्याचे दिसून येते.(Baramati)

नवा पवार (Pawar) पुतण्या

अजित पवार (Ajit Pawar) यांनी काका शरद पवार यांच्यापासून वेगळी राजकीय भूमिका घेतली. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी तर ‘कुटुंबाने आपल्याला एकटे पाडले’ असल्याची भावना जाहीरपणे व्यक्त केली. (Baramati) शरद पवार (Pawar) यांच्या सोबत त्यांची कन्या सुप्रिया सुळे, एक नातू रोहित पवार आणि आज २१ फेब्रुवारीला आणखी एक नातू, अजित पवारांचा (Ajit Pawar) पुतण्या युगेंद्र हेदेखील शरद पवार कंपूत सामील झाले.(Baramati)

(हेही वाचा- Farmers Protest : शंभू सीमेवर शेतकरी आक्रमक; १२०० ट्रॅक्टर्स घेऊन दिल्लीत घुसण्यासाठी पोलिसांवर दबाव )

अजितदादांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीतून(Baramati) त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांना लोकसभेला उतरवण्याची तयारी केल्याचे संकेत वेळोवेळी दिलेच आहेत. त्यामुळे त्यांची थेट लढत (शरद पवार यांनी एखादा डाव टाकला नाही तर) विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी होणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. नाव न घेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीतील(Baramati) भाषणात ‘मीच उमेदवार आहे असं समजून काम करा,’ असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. तसेच ‘ही माझी शेवटची निवडणूक, असे भावनिक आवाहन करतील,’ असे कार्यकर्त्यांना सांगून शरद (Pawar) पवार यांच्या आवाहनाला बळी पडू नका, असा कानमंत्र दिला.(Baramati)

सापत्नपणाची वागणूक

‘वरिष्ठ म्हणत होते सुप्रियाला अध्यक्ष करा, सुप्रियाला केलं काय आणि अजित (Ajit Pawar) झाला काय, एकच आहे ना? जर तुम्ही घर एक समजता, तर मी अनंतराव यांच्या पोटी जन्माला आलो म्हणून मला अध्यक्षपद नको का? आता कुणाच्या पोटी कुणी जन्माला यायचं, हे काय माझ्या हातात आहे?’ असे जाहीरपणे सांगून काका शरद पवार यांच्यावर सापत्नपणाची वागणूक मिळाल्याचे उदाहरण दिले.(Baramati)

(हेही वाचा- Sakinaka Murder & Suicide Case : लुडो गेम खेळताना झालेल्या वादात सहकाऱ्याची हत्या करून एकाची आत्महत्या )

स्तर अधिकाधिक घसरणार

अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुरू केलेल्या या भाषणाला अजून काही दिवसांनी शरद पवार (Pawar) समर्थकांकडून तसाच प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभेची आचारसंहिता आणि उमेदवाऱ्या जाहीर झाल्या की प्रचाराच्या झंझावातात वैयक्तिक चिखलफेकेचा स्तर अधिकाधिक घसरायला वेळ लागणार नाही. आणि त्यातून कटुता आणखी उग्र स्वरूप घेऊ शकते.(Baramati)

बारामती राजकीय राजधानी

बारामती(Baramati)  ही पवार कुटुंबाची राजकीय राजधानी, असे म्हटले तर वावगे ठरू नये. या राजधानीत कुणाचा झेंडा फडकणार? हे येणाऱ्या काळासोबत कोणत्या ‘घड्याळा’ची वेळ ठरवते, याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे.(Baramati)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.