भारताला २०४७ पर्यंत विकसीत राष्ट्र बनवणार – पंतप्रधान मोदी

दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते.

164
भारताला २०४७ पर्यंत विकसीत राष्ट्र बनवणार - पंतप्रधान मोदी

भारताला आगामी २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरूच्चार केला. दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते.

दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप सत्राला संबोधित करतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कुठल्याही देशात तेथील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था ही त्याच्या कामगिरीचे खरी प्रतीकं आहेत. दिल्ली विद्यापीठ हे केवळ विद्यापीठ नसून ही एक चळवळ आहे. या विद्यापीठाने प्रत्येक चळवळीला जीवन दिले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. मोदी म्हणाले की, मी पूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलो होतो, त्यावेळी मला जाणवले की जगात आपल्या देशाचा सन्मान वेगाने वाढला आहे. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. देशाचे लिंग गुणोत्तर सुधारले असून भारताच्या ड्रोन धोरणातही मोठा बदल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – सन १९८५ नंतर प्रथमच शिवसेनेचा मुंबई महापालिकेवर मोर्चा)

गेल्या शतकाच्या तिसऱ्या दशकाने स्वातंत्र्यलढ्याला नवी गती दिली होती, आता या शतकाचे हे तिसरे दशक भारताच्या विकासाच्या प्रवासाला नवी गती देईल. आज देशभरात मोठ्या प्रमाणात विद्यापीठे आणि महाविद्यालये स्थापन होत आहेत. आपल्या शैक्षणिक संस्था जगात एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. एक काळ असा होता जेव्हा विद्यार्थी कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी केवळ प्लेसमेंटला प्राधान्य देत असत. पण आजच्या तरुणाईला आयुष्याला त्यात बांधायचे नाही, काहीतरी नवीन करायचे आहे. स्वतःची रेषा आखायची आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.