अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर: मानधनात होणार २० टक्क्यांची वाढ

164

अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पाचव्या दिवशी मोठी घोषणा करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्क्यांची वाढ आणि २० हजार नव्या अंगणवाडी सेविका भरती करणार असल्याची मोठी घोषणा बालकल्याण विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यांपर्यंत २० हजार नव्या अंगणवाडी सेविकांची भरती होणार असून त्यांच्या मानधनात २० टक्के वाढ केली जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल देण्यासाठी १५० कोटी खर्च केले जाणार आहेत. याशिवाय महापालिका क्षेत्रात २०० कंटेनर अंगणवाड्या सुरू करणार असून अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार आहे.

दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी प्रश्नोतराच्या तासात अंगणवाडी सेविकांचा विषय होता. यावेळी विरोधकांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न उचलून धरला. तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर योग्य ते व समाधानकारक उत्तर बालविकास मंत्री लोढा यांनी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला होता. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देणार का? असा सवाल केला होता.

(हेही वाचा – ..असंच होणार म्हणतं अजित पवारांची संदीप देशपांडेंवरील हल्ल्यावर खोचक प्रतिक्रिया)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.