PM Narendra Modi : अयोध्या दौऱ्यावर असताना PM Narendra Modi म्हणाले, अयोध्या धामच्या विकासकामांचा अभिमान

174

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवार, 30 डिसेंबर रोजी अयोध्येचा दौरा केला. यावेळी त्यांनी अयोध्येतील रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले, तसेच त्यांनी वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. राममय असलेल्या अयोध्या धाममध्ये आज विविध विकास कामांचे लोकार्पण आणि शिलान्यास करुन मला अभिमान वाटत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा BAPS Hindu Mandir: अबुधाबीमध्ये पहिले भव्य हिंदू मंदिर उभारणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले उद्घाटनाचे निमंत्रण)

संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहतेय

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले की, आज संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा स्थितीत अयोध्यावासीयांमध्ये हा जल्लोष आणि उत्साह स्वाभाविक आहे. मी भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि भारतातील लोकांचा पूजक आहे. एक वेळ अशी होती की, अयोध्येमध्ये रामलला तंबूत राहत होता. आता रामाला त्याचे पक्क घर मिळाले आहे. पण फक्त रामरायालाच नाही तर देशातील 4 कोटी गरीब जनतेला देखील पक्की घरे मिळाली आहेत. आज आम्ही प्रत्येक घरात पाणी पोहोचवत आहोत. देशात केवळ महालोकाचीच निर्मिती झाली नाही, तर प्रत्येक घरात पाणीपुरवठा करण्यासाठी 2 लाखांहून अधिक पाण्याच्या टाक्याही बांधल्या गेल्या आहेत, मागील 9 वर्षात भारताने पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचा विश्वस्तरावर अभूतपूर्व विस्तार केला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.