RBI : बँकेच्या लॉकर नियमांमध्ये नवीन वर्षात होणार बदल; 31 डिसेंबर पर्यंत नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे RBI चे आदेश

नवीन वर्षात बँकेच्या लॉकर नियमांमध्ये बदल होऊन ग्राहकांच्या वस्तु आधिक सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

235
RBI : बँकेच्या लॉकर नियमांमध्ये नवीन वर्षात होणार बदल; 31 डिसेंबर पर्यंत नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे RBI चे आदेश

१ जानेवारी २०२४ पासून बँक लॉकर्सच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) बँक लॉकर्सची (lockers) नूतनीकरण प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. नूतनीकरण प्रक्रियेत लॉकर धारकाला नवीन बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागणार आहे. हा करार १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात येईल. (RBI )

सध्याच्या डिजिटल युगात लोक पैसे किंवा दागिने घरात ठेवत नाहीत. त्यासाठी बँकेच्या लॉकर्सचा पर्यायाचा अवलंब करतात. ग्राहकाला बँकेत या मौल्यवान गोष्टी ठेवण्यास विश्वासार्हता वाटते. त्यामुळे बँकेची भूमिका ही खूप महत्वाची असते. बँकेचे नियम हे भारतीय रिझर्व्ह बँकेकडूनच ठरवले जातात. त्याच पार्श्वभूमीवर लॉकर्स सुविधेशी संबंधित नियम नुकताच रिझर्व्ह बँकेकडून ठरवण्यात आले आहेत.

(हेही वाचा : BAPS Hindu Mandir: अबुधाबीमध्ये पहिले भव्य हिंदू मंदिर उभारणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले उद्घाटनाचे निमंत्रण)

काय आहे बँक लॉकर्सचा नवा नियम 

ग्राहकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आरबीआयकडून हे बदल करण्यात येतात. त्याचसाठी बँकेच्या लॉकर्स सुविधांच्या नियमांमध्ये आता काही बदल करण्यात आले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने आपले सामान बँकेच्या लॉकरमध्ये ठ्वले आणि ते खराब झाले तर त्याची नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी बँकेची असणार आहे. त्यामुळे बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूची पूर्ण जबाबदारी ही बँकेवर असेल.

जर त्या लॉकर मधील वस्तू खराब झाली तर बँकेला संबंधित ग्राहकाला लॉकर्ससाठी आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या १०० पट रक्कम दयावी लागेल. तसेच बँकेत एखादी आगीची घटना घडल्यास दरोडा पडल्यास किंवा कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास लोकेर्समध्ये ठ्वलेल्या वस्तूचे नुकसान झाले तर त्या नुकसानाची भरपाई देखील बँकेला द्यावी लागेल. त्यामुळे आता जर तुम्ही बँकेची लॉकर सुविधा वापरत असाल तर ३१ डिसेंबरपूर्वी बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी. तसेच या प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देखील आरबीआयने बँकांना दिलेत. यामुळे नववर्षात ग्राहकांना नव्या नियमांमुळे लॉकर सुविधांमध्ये लाभ होणार असून यामुळे ग्राहकांच्या वस्तू अधिक सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.