Congress च्या पिछेहाटीचे आणि BJP च्या विजयाचे काय आहे रहस्य ? 

211
Congress च्या पिछेहाटीचे आणि BJP च्या विजयाचे काय आहे रहस्य ? 
Congress च्या पिछेहाटीचे आणि BJP च्या विजयाचे काय आहे रहस्य ? 
काँग्रेस (Congress) आणि भाजपा (BJP) या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये प्राथमिक फरक आहे तो त्यांच्या निष्ठवंतांचा. काँग्रेसने (Congress) पक्षातील नेत्यांवर अवास्तव विश्वास ठेवला तर भाजपाने आपले कार्यकर्ते आणि मतदारांवर विश्वास टाकला. गेल्या काही वर्षात नेत्यांनी पक्ष बदलल्याने काँग्रेसची (Congress) व्होट-बँक ढेपाळली. याउलट भाजपाकडे (BJP) नेते नसले तरी मतदार कायम राहिल्याने विजयाची पताका फडकत राहिली.  हाच खरा  विजयाचा सुवर्णमार्ग आहे.
कार्यकर्त्यांची निष्ठा पक्ष नव्हे, नेत्याप्रती वाढली
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरात जवळपास सर्वच ठिकाणी काँग्रेसची (Congress) सत्ता आली होती. अनेक नेत्यांनी राजकीय पदाचा लाभ उठवत बक्कळ पैसा कमावला आणि संस्थानिक झाले. कुणी शैक्षणिक संस्था काढून तर कुणी साखर कारखाने सुरु करुन व्यवसाय आणि राजकारण केले. त्यांनी आपले बस्तान बसवले आणि कार्यकर्ते नेत्यांकडे वेठबिगार म्हणून काम करू लागले. परिणामी, कार्यकर्त्यांची निष्ठा ही नेत्याप्रती वाढली आणि पक्ष व कार्यकर्ता यातील दरी अधिकाधिक रुंदावत गेली. त्याचा फटका हळूहळू काँग्रेस (Congress) पक्षाला निवडणुकांमध्येही बसू लागला.
RSS च्या मुशीत तयार झालेली कार्यकर्त्यांची फळी 
भाजपासारखा (BJP) मजबूत आणि तत्व-शिस्तप्रिय केडर असलेला पक्ष गेल्या २०-२५ वर्षात देशभर घरोघरी पोहोचला. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांची फळी भाजपाकडे (BJP) सरकत गेली आणि त्याचा फायदा पक्षाला झाला. गेल्या १० वर्षात तर भाजपा (BJP) घरोघरी पोहोचला आणि काँग्रेसची (Congress) ऐतिहासिक पीछेहाट झाली. गेल्या १० वर्षापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणून देहाचे नेतृत्व करत आहेत. या यशात पक्ष नेत्यांसोबत कार्यकर्ते आणि मतदार यांचा सिंहाचा वाटा आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.