Supriya Sule: तुतारीवाला माणूस गावात पोचला का?

सुप्रिया सुळेंची धनिफित व्हायरल

225
Supriya Sule: तुतारीवाला माणूस गावात पोचला का? 
Supriya Sule: तुतारीवाला माणूस गावात पोचला का? 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (NCP Sharad Chandra Pawar) निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ (tutari) हे चिन्ह दिले खरे पण पक्षाकडे आता चिन्हाचीच (Supriya Sule) वाणवा असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. X वरील एका पोस्टमध्ये ध्वनिफीत व्हायरल होत आहे ज्यात तुतारी वाजवणारा माणूस सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बारामतीच्या प्रत्येक गावात पाठवल्याचे स्पष्ट होत आहे. या पोस्टने सगळयांचे लक्ष वेधले असून गावाकडे चर्चेचा विषय ठरला आहे.
तुतारी वाजवणारा कुठे खपला
संबंधित पोस्टमध्ये ‘तो तुतारी (tutari) वाजवणारा कुठे खपला बघा…!! @supriya_sule ताईंना तुतारी (tutari) वाजवण्यासाठी माणसं शोधावी लागत आहेत. ताई परत कधी आता विचारतील का..? अकेला देवेंद्र क्या करेगा..!!’ असे म्हटले होते. (Supriya Sule)
तूम्ही मतदार आहात ना माझे
त्याच पोस्टमध्ये एक ध्वनिफीत जोडण्यात आली असून त्यात सुप्रिया सुळे (Supriya Sule) या एका मतदाराला विचारतात की ‘तो तुतारीवाला गावात आला का’ त्यावर तो गावकरी म्हणतो नाही. तसेच तो वाहिनींसाठी (सुनेत्रा अजित पवार) (Sunetra Ajit Pawar) यांचे काम करत असल्याचे घाबरत सांगतो. त्याच्यावर अजिबात न रागावता, “ तूम्ही मतदार आहात ना माझे आणि चिन्ह तुमच्यापर्यंत पोचले पाहिजे. ही लोकशाही आहे,” असे सुप्रिया (Supriya Sule) त्याला सांगतात.
फुकायला पाठवलय की वाटायला?
राहुल पवार (Rahul Pawar) नावाच्या एका नेटकाऱ्याने या पोस्टवर प्रतिक्रिया देत ‘तुतारी (tutari) वाल्याला तुतारी फुकायला पाठवलय की वाटायला पाठवलाय????’ असा सवाल केला. यावरुन एक गोष्ट स्पष्ट झाली की, पक्षाला तुतारी (tutari) चिन्ह लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी भविष्यात खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. पोस्टमधील एक शेवटचे वाक्य मात्र लक्ष वेधून घेते.
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.