
-
प्रतिनिधी
Sunil Tatkare राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल आणि संघटनात्मक फेरबदलांच्या चर्चांनी वेग घेतला असतानाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षातील अंतर्गत घडामोडींवर प्रथमच सविस्तर भूमिका मांडली आहे. पक्षात कोणतीही गटबाजी किंवा मतभेद नसून सर्व निर्णय सामूहिक चर्चेतून घेतले जातात, असा दावा करत त्यांनी विविध चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. (Sunil Tatkare)
अलीकडेच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची दीर्घ भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीत मोठ्या बदलांची चर्चा सुरू झाली होती. काही माध्यमांमध्ये प्रदेशाध्यक्षपदावर बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या सर्व चर्चांना तटकरे यांनी फारसे महत्त्व दिले नाही. (Sunil Tatkare)
(हेही वाचा – Dahanu: ‘धवललक्ष्मी’चा तब्बल २२८ दिवसांत ४,७८५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण, मात्र ‘नॉट रिचेबल’; कारण?)
प्रशांत किशोर यांची पक्षाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे सांगत त्यांनी अशा चर्चांना आधार नसल्याचे स्पष्ट केले. एखाद्या नेत्याची भेट झाली म्हणून त्यातून नियुक्ती किंवा राजकीय निर्णय झाला, असा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले. (Sunil Tatkare)
आपल्या दीर्घ राजकीय अनुभवाचा उल्लेख करत तटकरे यांनी सांगितले की, जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी सर्व्हे किंवा बाह्य रणनीतीची गरज नसते. राज्यभर सातत्याने दौरे, कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनतेशी थेट संपर्क यामुळे राजकीय परिस्थितीची अचूक जाणीव होत असल्याचा दावा त्यांनी केला. २०१९ मधील पक्षाच्या यशामागे रणनीतीकार नव्हते, तर कार्यकर्त्यांची मेहनत होती, असेही त्यांनी अधोरेखित केले. (Sunil Tatkare)
(हेही वाचा – Pune Traffic Jam: स्वारगेट-कात्रज मार्गावर ट्रॅफिक जॅम, मेट्रोच्या कामामुळे चौकाचौकांत वाहनांच्या रांगा; वाहतुकीचा वेग मंदावला)
दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे यांनी “मी प्रॅक्टिकल राजकारणी आहे. मला रणनीतीकार किंवा सर्व्हेची गरज नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. शरद पवार, अजित पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत अनेक वर्षे काम केल्याचा उल्लेख करत त्यांनी आपण कधीही निवडणुकीसाठी सर्व्हेवर अवलंबून राहिलो नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ताकद तळागाळातील कार्यकर्ते आणि मजबूत संघटन असल्याचा पुनरुच्चार करत पक्षात कोणतीही अंतर्गत गटबाजी नसल्याचा दावा त्यांनी केला. (Sunil Tatkare)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
