Ravindra Waikar : उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर काय म्हणाले रवींद्र वायकर?

343
उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी शिवसेना शिंदे गटात रविवारी, १० मार्च रोजी रात्री जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खासदार गजानन कीर्तिकर यांची उपस्थिती होती. ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का मानला जात आहे.

धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात – वायकर

माझा मतदारसंघातील कामे मार्गी लागली पाहिजे, या दृष्टीने मी प्रामुख्याने शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. ते म्हणाले की, आरे बाबतीत लोक रडताहेत. रॉयल पंप एरियात पाण्याचे पंप, धोरणात्मक निर्णय बदलण्याची गरज होती म्हणून लोकांचे काम करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे न्याय देतील म्हणून शिवसेनेत दाखल झालो, असे रवींद्र वायकर (Ravindra Waikar)  माध्यमांशी बोलताना म्हणाले.

विश्वास ठेवला त्यांना न्याय मिळेलच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचे स्वागत आहे. गेली 40 ते 50 वर्षे ते बाळासाहेबांसोबत वायकर (Ravindra Waikar) काम करत आले आहेत. मी काय किंवा गजानन कीर्तिकर काय आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन काम करत आलो आहे. त्यांच्या मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतला त्याचे मी स्वागत करतो. राज्यातील महायुतीच्या माध्यमातून काम करत आहे. म्हणून त्यांनी घेतलेला सकारात्मक निर्णयाचे स्वागत करतो. विश्वास ठेवत आमच्या मतदारांना व सर्वसाधारण मुंबईकरांचे काम करण्यासाठी मी स्वागत करतो. माझे आणि त्यांचे गैरसमज निर्माण होत असे पण आमच्यातील संभ्रम आता दूर होत गेला आहे. जिल्हा जिल्ह्यातील तालुक्यातून लोक शिवसेनेत येत आहेत. मी दिलेला शब्द कधीही फिरवत नाही.

बाळासाहेबांची खरी शिवसेना आमची

बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार स्थापन करून राज्याच्या विकासाचे कामे सुरू झाले आहेत. सर्वसमावेशक सर्व घटकांचा निर्णय घेतले आहेत. या सरकारने निर्णयावर धडाका लावला आहे. आपले सरकार अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाले. नेगिटिव्ही दूर केली अडीच वर्षे जे नेगिटिव्ही होती ती बाजूला केली. चांगले दिवस संधी घेऊन आम्ही येत असतो असा विचार प्रत्येकाने करावा, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.