Ravindra Waikar : रवींद्र वायकर यांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

230

उबाठाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी रविवार, १० मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. आमदार रवींद्र वायकर उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे नेते आणि विश्वासू म्हणून ओळखले जात होते. शनिवार, ९ मार्च रोजी ठाकरेंनी वायकर यांच्या शाखेला भेट दिली होती. यावेळी रवींद्र वायकर यांनी ठाकरेंचे स्वागत केले होते. उद्धव ठाकरेंनी यावेळी रवींद्र वायकर आणि आमदार अनिल परब यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, असे वक्तव्य केले.

जोगेश्वरी भूखंड प्रकरणी चौकशी

रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्याविरोधात कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरु होती. विविध संस्थांनी या प्रकरणी तपास केला होता. ईडीकडूनही वायकरांची अनेकदा चौकशी झाली होती.

शिवसैनिक ते गृहनिर्माण राज्यमंत्री आमदार रवींद्र वायकर यांची नजिकच्या काळात ठाकरे गटाच्या नेते पदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर ठाकरे गटाकडून आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड, हिंगोली, परभणी या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी वायकर यांच्यावर दिली होती. वायकर यांनी मुंबई महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक म्हणून काम पाहिले. 1992 मध्ये ते जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते. तर वायकर पालिकेत महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही होते. त्यानंतर ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत.

(हेही वाचा Election Commissioner : निवडणूक आयुक्तांची रिक्त पदे भरण्यासाठी पंतप्रधान मोदी ऍक्शन मोडवर)

ठाकरेंच्या मर्जीतील नेते म्हणून ओळख

उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते आणि विश्वासू सहकारी म्हणून वायकर (Ravindra Waikar) यांची ओळख आहे. त्यांची काम करण्याची प्रवृत्ती आणि अभ्यासूपणा यामुळेच ते उद्धव ठाकरे यांच्या खास जवळचे आहेत. शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. 2014 मध्ये युतीचे सरकार राज्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र वायकर यांची गृहराज्य मंत्रिपदी वर्णी लावण्यात आली होती. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार आल्यानंतर वायकर यांना कॅबिनेटपदी बढती मिळेल, अशी शक्यता होती. पण, रवींद्र वायकर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती.

काही दिवसांपासून चौकशीच्या रडारवर

अनेक वेळा वायकर (Ravindra Waikar) हे तपास यंत्रणाच्या रडारवर आल्याने चर्चेत आले. यामध्ये कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु असलेली चौकशी आणि ईडीकडून सुरु असलेली चौकशी यामुळे वायकर चर्चेत होते. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांची पत्नी मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा देखील किरीट सोमय्या यांनी केला होता.

निरुपम यांचा पहिला आरोप

वायकरांवर सर्वात पहिल्यांदा काँगेस नेते संजय निरुपम वायकरांवर (Ravindra Waikar) सर्वात पहिल्यांदा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आरोप केला होता. वायकर आणि मातोश्रीचे आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप निरुपम यांनी केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र निरुपम यांना हे आरोप सिद्ध करता आले नव्हते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.