“बुरख्याआड मतचोरी, पुरावे आमच्याकडे!”; मंत्री Ashish Shelar यांचा महाविकास आघाडी, मनसेवर थेट प्रहार

124
“बुरख्याआड मतचोरी, पुरावे आमच्याकडे!”; मंत्री Ashish Shelar यांचा महाविकास आघाडी, मनसेवर थेट प्रहार
  • प्रतिनिधी

भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी आणि मनसेवर थेट, आक्रमक आणि पुराव्यानिशी हल्ला चढवला. “राज ठाकरेंनी ‘व्होट जिहाद’ करू नये ! मतचोरीचा गळा काढणारेच खरं तर बुरख्याआडून मतचोरी करत आहेत,” असा धडाकेबाज आरोप करत मंत्री शेलारांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे.

शनिवारी महाविकास आघाडीने सत्तेचा मोर्चा काढला आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले की, “गडबडी दाखवा !” यावर प्रत्युत्तर देताना मंत्री शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “ही घ्या उदाहरणे – तुम्ही विचारले, आम्ही दाखवतो !” मंत्री शेलारांनी ३१ विधानसभा मतदारसंघांतील दुबार मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची आकडेवारी सादर करत ‘व्होट जिहाद’चा भंडाफोड केल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की. या केवळ ३१ मतदारसंघांत २ लाख २५ हजार ७९१ दुबार मतदार आहेत, आणि संपूर्ण राज्यात ही संख्या १६ लाख ८४ हजार २५६ पर्यंत जाऊ शकते.

(हेही वाचा – Anil Ambani : ईडीची मोठी कारवाई! अनिल अंबानींची 3000 कोटींहून अधिक मालमत्ता जप्त!)

त्यांनी पुढे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची उदाहरणे देत मोठे घोटाळे उघड केले –
  • रोहित पवार (कर्जत-जामखेड) : ५,५३२ दुबार मुस्लिम मते.
  • नाना पटोले (साकोली) : ४७७ दुबार मते.
  • अमित देशमुख (लातूर) : २०,६१३ दुबार मते.
  • अस्लम शेख (मालाड पश्चिम) : १७,००७ दुबार मते.

(हेही वाचा – सिंहस्थ पर्वासाठी येणार किमान ५ कोटी भाविक; Nashik Airport चा होत आहे कायापालट)

“मतचोरीचा खोटा गळा काढून खरा घोटाळा लपवला जातो आहे. ‘चोर मचाये शोर’सारखा प्रकार सुरू आहे. महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंनी बुरख्याआड खेळू नये. महाराष्ट्रात बुरख्याआडून मतांच्या दुकानं चालू देणार नाही,” असे मंत्री शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

पत्रपरिषदेत त्यांनी दाखवले की काही ठिकाणी एकाच व्यक्तीची नावे मतदारयादीत दोन ते सहा वेळा आहेत, काहींच्या फोटोत किंवा लिंगातही बदल केला गेला आहे. शेवटी मंत्री शेलारांनी (Ashish Shelar) स्पष्ट इशारा दिला “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बुरख्याआड खेळणाऱ्यांना जनतेसमोर आणूच. आता आमच्याकडे आकडे, पुरावे आणि नावे  सगळं तयार आहे. हा खेळ आम्ही उघड करणारच!”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.