Varsha Gaikwad : वर्षा गायकवाड यांच्या नाराजीमागे हे आहे प्रमुख कारण…

286
उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडून Varsha Gaikwad यांची उमेदवारी जाहीर, याचसाठी केला होता नाराजी नाट्याचा प्रयोग

मुंबईत महाविकास आघाडीतील शिवसेनेला ४ जागा मिळाल्या असून काँग्रेसच्या (Congress) वाट्याला केवळ दोनच जागा आल्या आहेत. मात्र, आता यावरून काँग्रेसमध्ये उघडपणे नाराजी व्यक्त केली जात असली तरी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची ही नाराजी केवळ उत्तर मध्य लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठीच असल्याची जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे. वर्षा गायकवाड या स्वत:साठी नाराजी नाट्य रचत पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असून उत्तर पश्चिम मतदार संघात संजय निरुपम यांना उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसचे नेते आणि वर्षा गायकवाड यांनी प्रयत्न का केला नाही असाही सवाल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. (Varsha Gaikwad)

 (हेही वाचा- निवडणुकीनंतर केंद्रीय बल निघून जाईल, नंतर तुम्हाला TMC सोबत रहावे लागेल’; TMC च्या आमदाराची जनतेला धमकी)

जागा वाटपांची चर्चा होण्याआधीच…

शिवसेनेने मुंबईतील सहा जागांपैंकी चार लोकसभा मतदार संघांमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केल्यानंतरही गप्प बसून राहिलेल्या काँग्रेसच्या (Congress) मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मागील दोन दिवसांपासून आपणही नाराज असल्याचे प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले. मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघ हा काँग्रेसच्या वाट्याला यावा आणि याठिकाणी काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. परंतु या मतदार संघात शिवसेनेने अमोल किर्तीकर यांची उमेदवारी घोषित करून जागा वाटपांची चर्चा होण्याआधीच हा मतदार संघ आपल्याकडे घेतला होता. (Varsha Gaikwad)

मुंबई अध्यक्षा शिवसेनेला सामील…

या मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून निरुपम हे कडवी झुंज देवू शकले असते. परंतु मुंबई अध्यक्षा तसेच प्रदेशाध्यक्ष यांनी निरुपम यांच्यासाठी कोणताच प्रयत्न केलेला नाही. ही जागा सहजासहजी आपल्याकडे शिवसेनेने घेतल्यानंतरही काँग्रेसकडून कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. त्यामुळे मुंबई अध्यक्षा या शिवसेनेला सामील झाल्याचेही बोलले जात आहे.

 (हेही वाचा- Prakash Ambedkar यांनी तुषार गांधींचा घेतला समाचार)

 दक्षिण मध्य मुंबईत उमेदवारी न मिळाल्याने…

मात्र, दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याकडून आता जाहीर होणारी नाराजी ही केवळ उत्तर मध्य मुंबईत आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. दक्षिण मध्य मुंबईत उमेदवारी न मिळाल्याने याच्या नावावरून नाराजी व्यक्त करून उत्तर मुंबईची उमेदवारी आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न आहे. तसेच धारावी विधानसभेच्या मतदार संघात आपल्या भावाला उमेदवारी मिळवून देण्याचा मार्ग खुला करण्याचाही विचार असल्याचे बोलले जात आहे. (Varsha Gaikwad)

 (हेही वाचा- Sharad Pawar : २०१४ पासूनच भाजपासोबत जाण्यासाठी प्रयत्नरत होते; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट)

 ठाकरेंनी स्वत:साठी जास्त जागा मिळवल्या 

विशेष म्हणजे शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) हे फुटलेले असून एकमेव काँग्रेस पक्ष एकसंध आहे. मग फुटलेल्या शिवसेनेला २१ जागा कशा सोडल्या जात आहेत. त्यामुळे शिवसेना उबाठा कडून उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी  काँग्रेस शरद पवार गटाकडून शरद पवार हे थेट काँग्रेसच्या राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी यांना गुंडाळून या जागा आपल्याकडे वळवल्या आहे.  काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत बैठकीला बसत होते. परंतु हे दोन्ही नेते पक्षाचे प्रमुख नेते असून त्यांच्यासोबत राहुल गांधी यांनी खर्गे यांच्यासह चर्चेला बसायला हवे होते. परंतु त्याचा फायदा ठाकरे यांनी घेऊन काँग्रेसला जास्त जागा जाणार नाही याची काळजी घेत स्वत:साठी जास्त जागा मिळवल्या,असेही काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Varsha Gaikwad)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.