Vanchit Bahujan Aghadi : वंचितला आघाडीत घेणे काँग्रेसची मजबूरी

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा अंतर्गत विरोध असला तरीदेखिल वंचितला सोबत घेणे ही खरी काँग्रेसची ‘मजबूरी’ आहे. वंचितने स्वबळावर निवडणूक लढविणे काँग्रेसला परवडणारे नाही, हे २०१९ च्या लोकसभा निवडणुक निकालावरून सिध्द होते.

194
Vanchit Bahujan Aghadi: वंचित बहुजन आघाडीकडून १० उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा (Congress) अंतर्गत विरोध असला तरीदेखील वंचितला सोबत घेणे ही खरी काँग्रेसची ‘मजबूरी’ आहे. वंचितने स्वबळावर निवडणूक लढविणे काँग्रेसला परवडणारे नाही, हे २०१९ च्या लोकसभा निवडणुक निकालावरून सिध्द होते. मागच्या लोकसभेला वंचित आघाडीने ४० जागांवर तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती तर वंचितच्या मतांमुळे काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री (Former chief ministers) लोकसभेत जाऊ शकले नव्हते. (Vanchit Bahujan Aghadi)

वंचित आघाडीचे नेते अनभिज्ञ

काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP) आणि उबाठा (UBT) नेत्यांनी नुकतीच दिल्लीला बैठक घेऊन वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समावेश केल्याचे जाहीर केले. वंचित आघाडीचे नेते मात्र याबाबत अनभिज्ञ आहेत. उबाठा नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्ली येथील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना वंचित सोबत असल्याचे सांगितले. वंचितचे मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे (Siddharth Mokale) यांनी ‘हिंदूस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले की, “काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी अद्याप कोणतीही बोलणी झाली नसल्याने वंचितचा महाविकास आघाडीत समावेश ही निव्वळ धूळफेक आहे.” (Vanchit Bahujan Aghadi)

वंचितविरुद्ध राजकीय षडयंत्र

मोकळे पुढे म्हणाले, “आम्ही इंडी आघाडी सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. २०१९ निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकत क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते शक्य झालं नाही.” (Vanchit Bahujan Aghadi)

कॉँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठाला टोला

“जर राऊत म्हणाले त्याप्रमाणे वंचितचा महाविकास आघाडीत समावेशाबाबत सर्वांची सहमती आहे तर मग वांचितच्या समावेशाचे घोडे अडले कुठे? आणि जर सर्वसहमती नसेल तर असे वक्तव्य का करता? वंचित बहुजन आघाडीचा एकाही नेता इडी (ED), सीबीआय (CBI) यांच्या चौकशीखाली नाही,” असा टोला कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठाला लगावत “अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी संविधान वाचवण्यासाठी पुढे आली आहे, कारण तो आमच्या सन्मानाने जगण्याचा आणि सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग आहे,” असे मोकळे म्हणाले. (Vanchit Bahujan Aghadi)

केवळ वंचितच्या मतांमुळे पराभव

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत ४० मतदार संघात वंचितने तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. तर चंद्रपूर, गडचिरोली, हातकनंगले, हिंगोली, नांदेड, परभणी, सोलापूर या मतदार संघांत लाखाच्या वर मते घेतली. नांदेडचे काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar shinde) त्याचप्रमाणे गडचिरोलीचे काँग्रेस उमेदवार नामदेव उसेंडी, हातकनंगले येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju shetti) यांचा पराभव हा केवळ वंचितच्या मतांमुळे झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. धाराशिवचे राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील, परभणीचे राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, रायगडचे शिवसेना उमेदवार अनंत गीते या मतदार संघातही वंचितने प्रभाव पाडला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. (Vanchit Bahujan Aghadi)

(हेही वाचा – Municipal Recruitment Scam : पश्चिम बंगालमध्ये मंत्री आणि आमदार यांच्या घरावर EDची धाड)

वंचित बहुजन आघाडीच्या मतांची कमाल
चंद्रपूर

काँग्रेस- बाळू धानोरकर ५,५९,५०७

भाजप – हंसराज अहिर ५,१४,७४४

वंचित आघाडी- राजेंद्र महाडोले १,१२,०७९ (Vanchit Bahujan Aghadi)

गडचिरोली

भाजप- अशोक नेते ५,१९,९६८

काँग्रेस – नामदेव उसेंडी ४,४२,४४२

वंचित आघाडी- रमेशकुमार गजबे १,११,४६८ (Vanchit Bahujan Aghadi)

नांदेड

काँग्रेस- अशोक चव्हाण ४,४६,६५८

भाजप – प्रताप चिखलीकर ४,८६,८०६

वंचित आघाडी- यशपाल भिंगे १,६६,१९६ (Vanchit Bahujan Aghadi)

धाराशिव

शिवसेना – ओमराजे निंबाळकर ५,९६,६४०

राष्ट्रवादी – राणा जगजितसिंह ४,६९,०७४

वंचित आघाडी – अर्जुन सलगर ९८,५७९ (Vanchit Bahujan Aghadi)

परभणी

शिवसेना – संजय जाधव ५,३८,९४१

राष्ट्रवादी – राजेश विटेकर ४,९६,७४२

वंचित आघाडी – आलमगीर खान १,४९,९४६ (Vanchit Bahujan Aghadi)

सोलापूर

भाजप – जयसिधेश्वर महास्वामी ५,२४,९८५

काँग्रेस – सुशीलकुमार शिंदे ३,६६,३७७

वंचित आघाडी – प्रकाश आंबेडकर १,७०,००७ (Vanchit Bahujan Aghadi)

रायगड

राष्ट्रवादी – सुनील तटकरे ४,८६,९६८

शिवसेना – अनंत गीते ४,५५,५३०

वंचित आघाडी – सुमन कोळी २३,१९६ (Vanchit Bahujan Aghadi)

यवतमाळ

शिवसेना – भावना गवळी ५,४२,०९८

कॉँग्रेस – माणिकराव ठाकरे ४,२४,१५९

वंचित आघाडी – प्रवीण पवार ९४,२२८ (Vanchit Bahujan Aghadi)

हिंगोली

शिवसेना – हेमंत पाटील ५,८६,३१२

कॉँग्रेस – सुभाष वानखेडे ३,०८,४५६

वंचित आघाडी – मोहन राठोड १,७४,०५१ (Vanchit Bahujan Aghadi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.