Uttarakhand UCC : समान नागरी कायद्याच्या विरोधात उत्तराखंडात ‘शाहीन बाग’ची पुनरावृत्ती होणार?

ओडिसामधील ऑल ओडिसा इजतेमा कमिटी या मुसलमानांच्या संघटनेने १० ते १२ फेब्रुवारी हे दोन दिवस पिनझरपूर येथे ठिय्या आंदोलन करण्यासाठी मुसलमानांना कुटुंबकबिल्यासह जमण्याचे आवाहन केल्याचे समजते.

369

उत्तराखंड सरकारने विधानसभेत समान नागरी कायदा (Uttarakhand UCC) पारित केला आहे. त्यातील त्रुटी शोधून त्याचे कायद्यात रूपांतर करण्याचे काम आता प्रगतीपथावर सुरु झाले आहे. असे असताना आता तेथील मुसलमान या कायद्याला विरोध करण्याची तयारी करू लागले आहेत. १० ते १२ फेब्रुवारी हे दोन दिवस विविध मुसलमान संघटनांनी मुसलमानांना ओडिसा येथील पिनझरपूर येथे जमण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जसे मुसलमानांनी केंद्राच्या CAA कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथील रस्ता तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन करून अडवून ठेवला होता, त्याच आंदोलनाची पुनरावृत्ती करण्याचा कट येथील मुसलमानांनी केला असल्याची माहिती मिळत आहे.

दोन दिवस कुटुंबकबिल्यासह जमण्याचे आवाहन

या कायद्यामुळे विवाह, घटस्फोट आणि वारसा हक्क या महत्वाच्या बाबतीत सर्व धर्मांमध्ये एकवाक्यता आली आहे. त्यामुळे मुसलमान यांनी त्याला विरोध केला आहे. सध्या मुसलमानांसाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड लागू आहे. त्यामधील तरतुदी आणि समान नागरी कायद्यातील (Uttarakhand UCC) तरतुदी अगदी भिन्न आहेत. त्यामुळे मुसलमानांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. ओडिसामधील ऑल ओडिसा इजतेमा कमिटी या मुसलमानांच्या संघटनेने १० ते १२ फेब्रुवारी हे दोन दिवस पिनझरपूर येथे ठिय्या आंदोलन करण्यासाठी मुसलमानांना कुटुंबकबिल्यासह जमण्याचे आवाहन केल्याचे समजते. किमान १ लाख मुसलमान या ठिकाणी जमतील अशी शक्यता आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसाठी जेवण, नाष्टा, पाणी आणि राहण्याची सोय करण्यात आली आहे. ज्याप्रकारे शाहिनबाग येथे आंदोलन करून संपूर्ण सरकारी व्यवस्थेला घेरण्याचा प्रयत्न मुसलमानांनी केला होता, तशीच रणनीती यावेळी करण्यात आल्याचे दिसत आहे.

(हेही वाचा : Haldawi Madarsa Demolition : उत्तराखंडमध्ये अवैध मदरसा जमीनदोस्त; मुसलमानांकडून पोलिसांवरच दगडफेक, जाळपोळ)

उत्तराखंडात जातीय दंगलीला सुरुवात 

विशेष म्हणजे दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनावेळी दिल्लीत प्रचंड मोठी जातीय दंगल झाली होती, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंची घरे आणि दुकाने जाळण्यात आली होती, काही हिंदूंच्या यात हत्याही करण्यात आल्या होत्या. उत्तराखंडात दंगलीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. समान नागरी कायदा (Uttarakhand UCC) मंजूर झाल्याबरोबर धर्मांध मुसलमानांनी हैदोस घालायला सुरुवात केली. हल्दवानीमध्ये बनफूल पुरा भागात बेकायदा मदरसा आणि मशिदीवर प्रशासनाचा हातोडा पडताच त्यांनी उत्पात माजवत जाळपोळ करून हिंसाचार केला. या दंगलीमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून ५० पोलिसांसह अन्य १०० जण जखमी झाले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.