Halal Certificateच्या विरोधात योगी सरकार संतप्त; कंपन्यांवर करणार कारवाई

71

उत्तर प्रदेशचे योगी सरकार हे हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालू शकते. हलाल प्रमाणपत्राच्या (Halal Certificate) नावाखाली काही कंपन्या आपला व्यवसाय चालवत आहेत. अशा कंपन्या दुग्धव्यवसाय, कापड, साखर, स्नॅक्स, मसाले आणि साबण इत्यादी उत्पादने हलाल म्हणून प्रमाणित करून विकत आहेत. आता ही बाब मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निदर्शनास आली असून यामध्ये मोठी कारवाई होऊ शकते. उत्तर प्रदेश सरकार हलाल प्रमाणपत्राबाबत कठोर नियम बनवणार आहे.

हलाल उत्पादने विकणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल 

हलाल प्रमाणपत्र (Halal Certificate) दिल्यानंतर उत्पादने विकणाऱ्या कंपन्यांविरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शैलेंद्र शर्मा यांच्या तक्रारीवरून हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई, जमीयत उलेमा हिंद हलाल ट्रस्ट दिल्ली, हलाल कौन्सिल ऑफ इंडिया मुंबई आणि जमियत उलेमा महाराष्ट्र मुंबई यांनी हलाल प्रमाणपत्र (Halal Certificate) देऊन माल विकणाऱ्या अज्ञात कंपन्यांविरुद्ध आयपीसी कलम १२०बी/१५३अ/२९८, ३८४, ४२०, 467, 468, 471, 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतातील कोणतीही सरकारी संस्था असे प्रमाणपत्र देत नाही. यातून जमा होणारा पैसा दहशतवादी संघटनांना पुरवला जात आहे, असा आरोप होत आहे. रेखा डिक्शनरीनुसार हलाल आणि हराम हे दोन अरबी शब्द आहेत. इस्लाममध्ये हलाल म्हणजे, ‘जे इस्लामी धर्मशास्त्रानुसार योग्य आहे किंवा त्यास मान्यता आहे, जे शरियतनुसार आहे, ज्याचा उपभोग योग्य आहे, जो शरिया किंवा मुस्लिम धर्मग्रंथानुसार आहे. आणि हराम म्हणजे जे निषिद्ध नाही. कोणतेही बंधन नाही, कायदेशीर, वैध आहे. त्याचप्रमाणे, हराम म्हणजे जे इस्लामिक धर्मशास्त्रात निषिद्ध किंवा अस्वीकार्य आहे, निषिद्ध, वाईट, दूषित. खूप अप्रिय आणि पाप आहे.

(हेही वाचा Ashtvinayak : अष्टविनायकापैकी एक लेण्याद्री श्री गिरिजात्मज गणेश मंदिराची दुर्दशा; पुरातन विभागाकडून भक्तांची लूट, सोयीसुविधांचा अभाव   )

हलाल प्रमाणपत्र म्हणजे काय?

इस्लामिक धर्मशास्त्रात ज्या गोष्टींना हराम घोषित करण्यात आल्या आहे, त्या गोष्टी निषिद्ध आहेत, तर ज्या गोष्टी हलाल  (Halal Certificate) घोषित केल्या आहेत त्या करण्याची परवानगी आहे. इस्लाम धर्मानुसार हलाल पद्धत अन्नपदार्थांची उत्पादन प्रक्रिया आणि प्राण्यांच्या कत्तलीसाठी लागू होते. हलाल प्रमाणित म्हणजे संबंधित उत्पादन कुराणातील आयते म्हणून निर्माण करण्यात आले आहे. अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांवर ‘हलाल प्रमाणित’ शिक्का मारत आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन – हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करून आदर्श निर्माण करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून चालू असणारे देशविरोधी षडयंत्र रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांच्या नावाखाली त्या उत्पादनांना बेकायदेशीरपणे सर्टिफिकेशन दिले जात असल्याविषयी तक्रार उत्तर प्रदेशातील हजरतगंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि त्यावर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्परतेने दखल घेत कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे, असे वृत्त आहे. याबद्दल हिंदु जनजागृती समिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत आहे. याद्वारे देशविरोधी कारवायांना आर्थिक पाठबळ पुरवणार्‍यांवर कारवाई होऊन देशाची सुरक्षितता, कायदा सुव्यवस्था अधिक बळकट होईल, अशी आशा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.