Ashtvinayak : अष्टविनायकापैकी एक लेण्याद्री श्री गिरिजात्मज गणेश मंदिराची दुर्दशा; पुरातन विभागाकडून भक्तांची लूट, सोयीसुविधांचा अभाव   

217

अष्टविनायकापैकी (Ashtvinayak) सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. किल्ले शिवनेरीच्या सान्निध्यात, जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम केलेले आहे. मात्र आता या मंदिराची दुरवस्था झालेली दिसत आहे. या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांकडून प्रति माणसी २५ रुपये आकारले जातात, पण त्या तुलनेत मंदिराचे देखभाल होत नाही, त्यामुळे गणेशभक्तांकडून संताप व्यक्त होऊ लागला आहे. जोवर सोयीसुविधा उपलब्ध करून दिले जात नाही, तोवर गणेशभक्तांकडून पैसे वसूल करू नयेत, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे निमंत्रक सुनील घनवट यांनी केली आहे.

मंदिर बनले महसूल जमवण्याचे साधन  

पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत. या ठिकाणी कायम भक्तांची वर्दळ असते, परंतु आता हे मंदिर म्हणजे पुरातन विभागाचा महसूल जमवण्याचे साधन बनले आहे कि काय, असा प्रश्न पडू लागला आहे. या ठिकाणी लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून प्रति माणसी २५ रुपये आकारले जातात, परंतु केवळ श्री गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांकडूनही हे पैसे उकळले जात आहेत, हे कितपत योग्य आहे, असा सवाल आता महाराष्ट्र मंदिर महासंघाने उपस्थित केला आहे. यामुळे गणेशभक्तांमध्ये संताप निर्माण होऊ लागला आहे.

ticket

(हेही वाचा Uddhav Thackeray Election Commission : उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगावर आरोप; आता आचारसंहिता बदलली का ?)

मंदिर आणि परिसरात सुविधांचा अभाव 

या राज्यात महामार्ग बांधला जातो, त्यानंतर त्यांच्या देखभालीसाठी आणि बांधकामाचा खर्च वसूल होण्यासाठी टोल आकाराला जातो, जर हाच नियम या ठिकाणी लावायचा म्हटले तर गणेशभक्तांकडून वसूल केलेल्या पैशातून पुरातन विभाग मंदिर आणि मंदिराच्या परिसराची डागडुजी करत आहे हेही दिसत नाही. हे मंदिर पेशवेकालीन दगडी बांधकाचे आहे. या मंदिराचे दगड निघाले आहेत. संरक्षित भिंत पडत आहेत, विशेष म्हणजे मंदिराकडे जाण्यासाठी ४०० पायऱ्या आहेत, त्या त्यातील बऱ्याच पायऱ्या तुटलेल्या आहेत, त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पायऱ्यांवरून पडण्याची भीती कायम असते. या पायऱ्या चढताना महिला आणि वृद्धांना अधिक त्रास होत असतो, अशा वेळी काही काही अंतरावर भक्तांचा विश्रांतीसही आसने बसवणे गरजेचे आहे, पण त्याचीही सोय केलेली नाही. पायऱ्यांच्या बाजूने संरक्षण बॅरिकेट्स बसवलेले नाहीत. या ठिकाणी मंदिरात पुरेसा प्रकाश असेल असे लाईट बसवण्यात आले नाहीत.

एकूणच काय अष्टविनायकापैकी  (Ashtvinayak) एक असलेले हे लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज गणेश मंदिराचे धार्मिकदृष्टया महत्व असले तरी पुरातन विभागाकडून हे दुर्लक्षित राहिलेले आहे. गणेशभक्तांकडून पैसे वसूल करूनही पुरातन विभाग मंदिराच्या देखभालीकडे दुर्लक्ष करत आहे, ही बाब संतापजनक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.