मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; कायदा मंत्रालयाचा कारभार किरेन रिजिजू यांच्याकडून काढून घेतला

167
मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; कायदा मंत्रालयाचा कारभार किरेन रिजिजू यांच्याकडून काढून घेतला
मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; कायदा मंत्रालयाचा कारभार किरेन रिजिजू यांच्याकडून काढून घेतला

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी संसदीय कार्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांची कायदा मंत्रीपदी नेमणूक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास मंजुरी दिली आहे.

अर्जुनराम मेघवाल हे राजस्थानमधील एक मोठे नेते म्हणून परिचित असून ते सध्या संसदीय कार्य आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांच्याकडे आता कायदा आणि न्याय विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. मेघवाल हे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी होते. ते मूळचे राजस्थानचे आहेत. राजस्थानमधील एक मोठे नेते म्हणून ते परिचित आहेत. बिकानेर आणि फिलीपाईन्समधून त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी एमए, एलएलबी आणि एमबीएच्या पदव्या घेतलेल्या आहेत.

(हेही वाचा – Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना दिल्ली हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा)

अर्जुन राम मेघवाल यांना किरेन रिजिजू यांच्या जागी त्यांच्या विद्यमान खात्यांव्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सोपवला. किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका ही होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली रणनीति आखण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.