J.P. Nadda : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सावरकर सदनास भेट

यावेळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माहिम विधानसभा प्रमुख अक्षता तेंडुलकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

208
J.P. Nadda : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सावरकर सदनास भेट

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P. Nadda) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, गुरुवारी सकाळी त्यांनी दादर येथील सावरकर सदनास भेट दिली. सावरकरांशी संबंधित अनेक गोष्टींची यावेळी त्यांनी माहिती घेतली.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सुविधा द्या; मुख्यमंत्री शिंदे यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश)

नड्डा (J.P. Nadda) यांनी सर्वप्रथम सावरकर सदनातील स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केले. त्यानंतर वीर सावरकरांच्या सूनबाई सुंदर सावरकर यांची भेट घेत विचारपूस केली. सावरकरांशी संबंधित अनमोल ठेवा त्यांनी आस्थेने पाहिला, त्याबद्दल माहिती घेतली. स्वातंत्र्यवीरांचा दिनक्रम, त्यांच्या कामकाजाची पद्धत याविषयी वीर सावरकर यांची नात असिलता सावरकर- राजे यांनी नड्डांना (J.P. Nadda) माहिती दिली. सावरकरांचे वास्तव्य असलेल्या खोलीची पाहणी यावेळी त्यांनी केली.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सावरकर सदनाला भेट देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कौटुंबिक जीवनाविषयी विचारपूस केली. त्यांचे अखेरचे दिवस कसे होते, याविषयी त्यांनी आस्थापूर्वक जाणून घेतले. मी त्यांना सांगितले, या वास्तूला ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच इमारतीत त्यांचे वास्तव्य होते. वरच्या मजल्यावरची खाटही त्यांचीच. या खाटेवर ते तीन वर्षे होते आणि त्यांनी अखेरचा श्वासही इथेच घेतला, अशी माहिती त्यांना दिली.
असिलता सावरकर-राजे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात

हेही पहा – 

यावेळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माहिम विधानसभा प्रमुख अक्षता तेंडुलकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतल्यानंतर सावरकरांना अभिवादन करून नड्डा (J.P. Nadda) यांनी आपल्या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्याची सुरुवात केली. सकाळी १०.४५ वाजता त्यांनी रवींद्र नाट्य कौशल्य विकास कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर दुपारी ते विनोद तावडे यांच्या निवासस्थानी जातील. तेथून पुढे मुंबई विमानतळावरून ते पुण्यासाठी रवाना होतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.