Dasara Melava 2023 : ठाकरेंना धास्ती; दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शाखाप्रमुखांना दिले ‘हे’ टार्गेट

त्यानुसार, दसरा मेळाव्यासाठी प्रत्येक शाखेतून ४ बस सोडण्यात येणार असून, यंदा मुंबईतून ५० हजारांपेक्षा अधिक गर्दी जमविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

159
Dasara Melava 2023 : ठाकरेंना धास्ती; दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शाखाप्रमुखांना दिले 'हे' टार्गेट
Dasara Melava 2023 : ठाकरेंना धास्ती; दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शाखाप्रमुखांना दिले 'हे' टार्गेट

सणासुदीला वाद टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याला शिवतीर्थ मैदान ‘उबाठा’ गटाला सोडले असले, तरी शिवाजी पार्क पेक्षा तिप्पट गर्दी जमवून ठाकरेंना शह देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे ठाकरेंनी याची धास्ती घेतली असून, दसरा मेळाव्याला तोडीसतोड गर्दी जमवण्यासाठी मुंबईतील शाखाप्रमुखांना टार्गेट आखून दिले आहे. (Dasara Melava 2023)

त्यानुसार, दसरा मेळाव्यासाठी प्रत्येक शाखेतून ४ बस सोडण्यात येणार असून, यंदा मुंबईतून ५० हजारांपेक्षा अधिक गर्दी जमविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईत उबाठा गटाच्या २२७ शाखा आहेत. या सर्व शाखांमधून जवळपास ९०० बस सोडल्या जातील, अशी माहिती उबाठा गटातील एका वरिष्ठ नेत्याने दिली. (Dasara Melava 2023)

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी शिवाजी पार्कमधील तयारी आणि इतर विषयांवर चर्चा झाली. शिवाय गर्दी जमवण्यासाठी मायक्रो प्लानिंग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून जवळपास तीन लाखांची गर्दी जमवण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीस गर्दी जमवण्यासाठी मुंबईतील प्रत्येक शाखेतून ४ बस सोडल्या जाव्यात, अशी सूचना ठाकरेंकडून करण्यात आली आहे. (Dasara Melava 2023)

(हेही वाचा – MLA Disqualification  ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात फटका, सुनावणी पुन्हा लांबणीवर)

मुंबईत किती शाखा?

मुंबईत उबाठा गटाच्या २२७ शाखा आहेत. प्रत्येकी ४ बस सोडल्यास ९०८ गाड्या भरून कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल होतील. एकट्या मुंबईतून यंदा ५० हजारांपेक्षा जास्त गर्दी अपेक्षित आहे. त्यासाठी विभागप्रमुखांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्याचे कळते. (Dasara Melava 2023)

राजन विचारेंवर ‘ही’ जबाबदारी

मुंबईत शिवसेनेचे १२ विभागप्रमुख आहे. दसरा मेळाव्यासाठी प्रत्येकाला जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. त्याशिवाय ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, नाशिकमधून मोठी गर्दी अपेक्षित आहे. खासदार राजन विचारे यांच्यावर ठाण्यासह, मीरा-भाईंदर व नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेत, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे समजते. (Dasara Melava 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.