Uday Samant : बारसू प्रकरणावरून मंत्री उदय सामंत यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण कोणीही करू नये. Uday Samant

38
Uday Samant
Uday Samant : बारसू प्रकरणावरून मंत्री उदय सामंत यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘बारसू रिफायनरी’ प्रकल्पाला विरोध केल्याने उदय सामंत यांनी ही टीका केली आहे.

राज्यातील राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक गोष्टी घडतांना दिसत आहेत. सरकार आणि विरोधी पक्ष नेते एकमेकांवर टीका करण्याची एकदेखील संधी सोडत नाही आहेत. अशातच सध्या ‘बारसू रिफायनरी’ प्रकल्पावरून जोरदार राजकारण सुरु झाले आहे. सरकारच्या या प्रकल्पाला विरोधी पक्षाकडून कडाडून विरोध होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

(हेही वाचाबारसूमध्ये रिफायनरीसाठीचे सर्वेक्षण थांबवा; अजित पवारांची मागणी)

‘एकीकडे राज्यातील प्रकल्प गेले म्हणून ओरडायचं आणि दुसरीकडे राज्यात येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करायचा, हा दुटप्पीपणा असून बारसू येथील नागरिकांना भडकवण्याचं काम काही लोक करत आहेत.’ अशा भाषेत उदय सामंत (Uday Samant) यांनी टीका केली आहे.

हेही पहा – 

नेमके काय म्हणाले उदय सामंत?

‘बारसू प्रकल्पाबाबत स्वतः उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा जीडीपी ८.५ ने वाढेल असं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं. तसेच आम्ही या प्रकल्पासाठी १३ हजार एकर जमीन देऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता तेच या प्रकल्पाला विरोध करत आहेत. एकीकडे राज्यातील प्रकल्प गेले म्हणून ओरडायचं आणि दुसरीकडे राज्यात येणाऱ्या प्रकल्पांना विरोधा करायचा, हा दुटप्पीपणा आहे. बारसू येथील नागरिकांना भडकवण्याचं काम काही लोकांकडून करण्यात येत आहे. अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण कोणीही करू नये.’ अशा शब्दांत मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी टीका केली. तसेच, सध्या केवळ बारसू येथील मातीचं परीक्षण केलं जात आहे, त्यानंतर इथे रिफायनरी सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय होईल, यादरम्यान स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल; असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.