Congress : काँग्रेस आणि स्मृती इराणी यांच्यात रंगले ट्विटर वाॅर; 2024च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम

काँग्रेसने स्मृती इराणी यांचा फोटो ट्विटरवर टाकत 'हरविल्या आहेत', असे लिहिले होते. यावर प्रतिउत्तर देत इराणी यांनी काव्यत्मक पद्धतीने मजेशीर उत्तर दिले आहे.

84

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये होणार आहे. मात्र निवडणुकीची तयारी जोरात सुरु झालेली दिसून येते आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले आहे.

काँग्रेसने स्मृती इराणी यांचा फोटो ट्विटरवर टाकत ‘हरविल्या आहेत’, असे लिहिले होते. यावर प्रतिउत्तर देत इराणी यांनी काव्यत्मक पद्धतीने मजेशीर उत्तर दिले आहे.
त्या म्हणाल्या की, हे दिव्य राजनीतिक प्राणी….’ने सुरुवात करीत आपण सिरसीरा गावातून निघत असून अमेठीला पोहचत आहोत. जर तुम्ही माजी खासदार महोदयांना शोधत असाल तर कृपया अमेरिका येथे संपर्क साधावा. यावर काँग्रेसने उत्तर देत म्हटलं आहे की, जंतरमंतरवर सुरु असलेल्या कुस्तीपटुंच्या आंदोलनासंदर्भात हे ट्विट करण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.