BMC : मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्कमध्ये म्हातारीचा बुटच नाही तर ‘हे’ असणार आकर्षण…

उद्यानात अडीच हजार बहरलेली झाडेही आहेत. म्हातारीच्या बुटासह कमला नेहरू पार्कमध्ये दहा फूट उंचीचा शंख उभारण्यात आला असून, तो पर्यटकांचे सेल्फीसाठी लक्ष वेधून घेत आहे. जॉगिंग ट्रॅक असणार धुळमुक्त

231

वाळकेश्वर (मलबार हिल) परिसरातील सर फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्क येथे महानगरपालिकेकडून जॉगिंग ट्रॅक, काचेचा पूल अशा नवनवीन सुविधा उभारण्यात येणार आहेत. पर्यटकांसाठी आकर्षण ठरणाऱ्या या दोन्ही ठिकाणांवरील वृक्षसंपदा जोपासण्यात येणार आहे. यातील म्हातारीच्या बुटासह कमला नेहरू पार्कमध्ये दहा फूट उंचीचा शंख उभारण्यात आला असून, तो पर्यटकांचे सेल्फीसाठी लक्ष वेधून घेत आहे. शिवाय उद्यानात पाथवे, पर्यटकांसाठी खान-पानाची जागा, खेळाची उपकरणे, इको पॉइंट, फिश पॉन्ड, लोटस पॉन्ड, समर हाऊस, पृथ्वी कारंजे,  गॅझेबो,  एक्यूप्रेशर वॉल, बेअर लँड स्लोप भाग आदी सुविधाही आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त  आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी)  चक्रधर कांडलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्कमधील विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. वाळकेश्वर (मलबार टेकडी) च्या माथ्यावर असलेले सर फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्क हे मुंबई शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये गणले जातात. या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मुंबईकरांसह असंख्य पर्यटक भेट देत असतात.

(हेही वाचा Shri Ram Mandir : …अयोध्या सजणार, सात दिवस सोहळा रंगणार; मोदींच्या हस्ते श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याची शक्यता)

सर फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्कमध्ये काय आहे..

हिरवळ, शोभेची झाडे,  फुलझाडे, गॅझेबो, पर्यटकांच्या आसनव्यवस्थेसाठी विविध आकर्षक बाकडे, सेल्फी पॉइंट, रंगीबेरंगी प्रवेशद्वार आदी उद्यानांच्या सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे हे दोन्ही उद्यान पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहेत. तसेच दोन्ही बागांचे क्षेत्रफळ अंदाजे ३५००० चौरस मीटर आहे. याशिवाय उद्यानात पाथवे, पर्यटकांसाठी खान-पानाची जागा, खेळाची उपकरणे, इको पॉइंट, फिश पॉन्ड, लोटस पॉन्ड, समर हाऊस, पृथ्वी कारंजे,  गॅझेबो,  एक्यूप्रेशर वॉल, बेअर लँड स्लोप भाग आदी सुविधा आहेत. तसेच जवळपास १५००० चौरस  मीटर जागा बागेच्या आवारातील रँक वनस्पतींनी व्यापलेली क्षेत्र आहे. तसेच उद्यानात अडीच हजार बहरलेली झाडेही आहेत. म्हातारीच्या बुटासह कमला नेहरू पार्कमध्ये दहा फूट उंचीचा शंख उभारण्यात आला असून, तो पर्यटकांचे सेल्फीसाठी लक्ष वेधून घेत आहे.

kamala nehru1

जॉगिंग ट्रॅक असणार धुळमुक्त

सर फिरोजशाह मेहता उद्यानमधील जॉगिंग ट्रॅकवर लवकरच विटांचा खच टाकून ट्रॅक नव्याने तयार करण्यात येणार आहे. या नव्या कामामुळे येथे फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना धुळीचा त्रास होणार नाही. तसेच चालताना पायांना आरामदायी वाटेल. तसेच या नवीन कामामुळे जॉगिंग ट्रॅक भुसभुशीत होणार असून, नागरिकांना चालताना नक्कीच फायदा होणार आहे.

kamala

फुल, फळझाडांचे  वाढणारअसे आयुष्य..

सर फिरोजशहा मेहता उद्यानमधील हिरवळीवर आणि झाडांभोवती लाल माती टाकण्यात येणार आहे. तसचे येथील फुल आणि फळझाडांनाही शेणखत टाकण्यात येणार आहे. लाल माती टाकल्याने लॉनच्या अवतीभवती असलेली झाडे हिरवीगार राहणार आहेत. शेणखतामुळे या झाडांचे आयुष्यही वाढणार असून, झाडे सदा बहरलेली राहणार आहेत. तसेच शेणखत आणि लाल मातीमुळे येत्या पावसाळ्यात बागकामालाही वेग येणार आहे.

IMG 20230602 WA0126

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.