Transfer of Charted Officers : पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; एस.पी.सिंह दिव्यांग कल्याण आयुक्तपदी

20
Transfer of Charted Officers : पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; एस.पी.सिंह दिव्यांग कल्याण आयुक्तपदी
Transfer of Charted Officers : पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; एस.पी.सिंह दिव्यांग कल्याण आयुक्तपदी

राज्य सरकारने सोमवारी पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.(Transfer of Charted Officers)

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. जी. कोलते यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून तर २०१० च्या तुकडीचे अधिकारी कैलाश पगारे यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या व्यस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महामंडळाचे व्यस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग यांची मुंबईत अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या शिधा नियंत्रकपदी तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अजित पवार यांची मुंबईत दुग्धविकास आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.(Transfer of Charted Officers)

(हेही वाचा : SRA Fire OC : आगीबाबतच्या एनओसीतील अटींची पूर्तता होत नाही तोवर ओसी नाही)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.