SRA Fire OC : आगीबाबतच्या एनओसीतील अटींची पूर्तता होत नाही तोवर ओसी नाही

अशी शिफारसचे गोरेगाव आग प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने आपल्या प्राथमिक अहवालात केली आहे.

125
SRA Fire OC : आगीबाबतच्या एनओसीतील अटींची पूर्तता होत नाही तोवर ओसी नाही
SRA Fire OC : आगीबाबतच्या एनओसीतील अटींची पूर्तता होत नाही तोवर ओसी नाही

ज्‍या पुनर्वसन इमारतीस प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्‍या खात्‍यामार्फत आगीबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र अ‍टींसापेक्ष दिले असेल, अशा प्रकरणांमध्‍ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी भोगवटा प्रमाणपत्र देण्‍यापूर्वी अटींची पूर्तता विकासकाने केली आहे किंवा नाही याबाबतची खातरजमा करुन या अटींची पूर्तता होईपर्यंत विकासकास भोगवटा प्रमाणपत्र देण्‍यात येऊ नये, अशी शिफारसचे गोरेगाव आग प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने आपल्या प्राथमिक अहवालात केली आहे. (SRA Fire OC)

उन्नत नगर, गोरेगाव (पश्चिम) जय भवानी एस. आर. ए. को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५१ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समितीने प्राथमिक चौकशी अहवाल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर केला. त्यात भविष्यात आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समितीने उपाययोजना सुचविल्या आहेत. (SRA Fire OC)

भविष्‍यात अशा प्रकारच्‍या आगीच्‍या घटनांची पुनरावृत्‍ती टाळण्‍यासाठी करावयाच्‍या उपाययोजनाबाबत संबंधित समितीने शिफारशी केल्या आहेत. पुनर्वसन इमारतींचे बांधकाम पूर्णत्‍वास गेल्‍यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई अग्निशमन दल व सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित खाते यांच्‍या संयुक्‍त तपासणीनंतर आवश्‍यक पूर्ततेच्‍या खातरजमेअंती अंतिम भोगवटा प्रमाणपत्र देण्‍यात यावे, असे या समितीने नमुद केले आहे. (SRA Fire OC)

प्रत्यक्ष खातरजमा केल्यानंतरच अंतिम एनओसी

ज्‍या पुनर्वसन इमारतीस प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्‍या खात्‍यामार्फत आगीबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र अ‍टींसापेक्ष दिले असेल अशा प्रकरणांमध्‍ये वास्‍तुविशारदाकडून अथवा विकासकाकडून सदर अटींची पूर्तता करण्‍यात आल्‍यानंतर त्‍याअनुषंगाने प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्‍या खात्‍यामार्फत त्‍याबाबत प्रत्‍यक्ष खातरजमा केल्‍यानंतरच अंतिम ना-हरकत प्रमाणपत्र जारी करावे. (SRA Fire OC)

फॉर्म बी तपासण्यासंदर्भात अग्निशमन दलाची नियमावली

ब-याच पुनर्वसन इमारतींमध्‍ये भोगवटा प्रमाणपत्र मिळण्‍यापूर्वीच रहिवाश्‍यांना ताबा दिला जात असल्‍याची बाब निदर्शनास येते. अशा इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्‍त नसल्‍यामुळे अग्निशमन दलाच्‍या कार्यपद्धतीनुसार त्‍या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र (फॉर्म-बी) मागितला जात नाही. तरी अशा इमारतींमध्‍येदेखील ‘फॉर्म-बी’ च्‍या अनुषंगाने तपासणी/पडताळणी करण्‍याबाबत नियमावली अग्निशमन दलाने विकसित करावी. (SRA Fire OC)

(हेही वाचा – Congress vs Mayawati : काँग्रेसचा खेळ बिघडविण्यासाठी मायावती मध्यप्रदेशच्या मैदानात)

तपासणी करणारी यंत्रणा सक्तीची

पुनर्वसन इमारतींमध्‍ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र-फॉर्म ‘बी’ नियमानुसार प्राप्‍त होत असल्‍याबाबत खातरजमा/तपासणी करणारी यंत्रणा मुंबई अग्निशमन दलाने निर्माण करणे सक्‍तीचे करण्‍यात यावे. (SRA Fire OC)

लिफ्टचे दरवाजे जाळीऐवजी स्टीलचे असावे

पुनर्वसन इमारतीमध्‍ये असणारी उदवाहनांचे दरवाजे प्रामुख्‍याने जाळीचे (ग्रील) असल्‍याचे निदर्शनास येते. आगीच्‍या वेळी सदर उदवाहनाच्‍या जागेतून आग आणि धूर पसरण्‍यास वाव मिळतो. यास्‍तव अशा इमारतीमधील उदवाहनांना बंद स्‍टीलचे दरवाजे असणे सक्‍तीचे करण्‍यात यावे. (SRA Fire OC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.