Congress vs Mayawati : काँग्रेसचा खेळ बिघडविण्यासाठी मायावती मध्यप्रदेशच्या मैदानात

मायावती यांनी मध्यप्रदेशच्या निवडणुकीत दंड थोपटल्यामुळे काँग्रेसच्या रणनितीला जबरदस्त धक्का बसला आहे.

98
Congress vs Mayawati : काँग्रेसचा खेळ बिघडविण्यासाठी मायावती मध्यप्रदेशच्या मैदानात
Congress vs Mayawati : काँग्रेसचा खेळ बिघडविण्यासाठी मायावती मध्यप्रदेशच्या मैदानात

गेल्या वीस वर्षांपासून मध्यप्रदेशच्या सत्तेत परतण्यासाठी आसुसलेल्या काँग्रेस पक्षाच्या पायाखालची जमीन सरकविणारी घटना राज्यात घटली आहे. मायावती यांनी मध्यप्रदेशच्या निवडणुकीत दंड थोपटल्यामुळे काँग्रेसच्या रणनितीला जबरदस्त धक्का बसला आहे. मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचा मुख्य मुकाबला भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षात होणार आहे. परंतु, उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने मध्यप्रदेशातील गोंडवाना गणतंत्र पक्षाशी युती करून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. (Congress vs Mayawati)

बहुजन समाज पक्ष आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी यांची आघाडी मध्यप्रदेशच्या राजकारणात खेळ बनविणे आणि बिघडविण्यात सक्षम असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. २०१८ च्या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष ६८ जागांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होता. दलित आणि आदिवासींच्या पाठिंब्याने मायावती राजकीय क्षेत्रात भूकंप आणण्यात माहिर आहेत हेही मागच्या निवडणुकीत दिसून आले आहे. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय राजकीय वातावरण तापत आहे. मध्यप्रदेशातील सध्याचे राजकीय वातावरण बघितले तर असे दिसून येते की, मुख्य मुकाबला भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षात आहे. मात्र, बसपाने गोंगपसोबत आघाडी करून निवडणुकीत उडी मारल्यामुळे मुकाबला रोमांचक झाला आहे. (Congress vs Mayawati)

(हेही वाचा – Dasara Melava 2023 : दसरा मेळाव्यांसाठी १५ हजार पोलीसांसह राज्य राखीव दलाच्या ३३ तुकड्या तैनात)

मागच्या निवडणुकीतील आकडेवारीवरून स्पष्ट होते की, बसपाने मागच्या निवडणुकीत काँग्रेसचा ६८ जागांवर खेळ बिघडविला होता. आता पुन्हा एकदा बसपाने स्थानिक पक्षाशी आघाडी करून राज्यात मोठा गेम करण्यासाठी डाव खेळला आहे. समाजवादी पक्षाने उमेदवार उभे केल्यामुळे काँग्रेसचे आधीच बीपी वाढले आहे. यात आता भर पडली आहे ती बसपा आणि गोंगपच्या आघाडीची. काँग्रेसला सपापेक्षा बसपपासून जास्ती धोका आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मागच्या निवडणुकीतही सपापेक्षा बसपने काँग्रेसचा खेळ बिघडविला होता. (Congress vs Mayawati)

मागच्या निवडणुकीत बसपामुळे अटेर, कोलारस, बिना आणि टिकमगड या मतदारसंघात अवघ्या काही मतांमुळे कॉग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. अटेरमध्ये ५००० मतांनी, कोलारसमध्ये अवघ्या ७२० मतांनी, बिनामध्ये ६३२ मतांनी, तिमरनीमध्ये काँग्रेसचा २२१३ मतांनी पराभव झाला होता. बिजाजपूरमध्ये काँग्रेसचा २८४० मतांनी पराभव झाला होता. येथे बसपला ३७००० हून अधिक मते मिळाली होती. टिकमगडमध्ये ४१७५ मतांनी पराभव झाला होता. असे कितीतरी मतदारसंघ आहे जेथे अवघ्या काही मतांनी काँग्रेसचा पराभव झाला होता तो केवळ बसपमुळे. या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी बसपा पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. यामुळे काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे. (Congress vs Mayawati)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.