महाराष्ट्रात ममतांच्या मराठमोळ्या शुभेच्छा! म्हणाल्या…

99

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी शहरात दाखल होताच ‘जय मराठा, जय बांगला’चा नारा दिला. या भेटीपूर्वी ममता बॅनर्जी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची मनं जिंकून घेतली. यासह ममता बँनर्जींनी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी संवाद साधला. ममता बॅनर्जींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली असून महाराष्ट्रात त्यांनी मराठमोळ्या शुभेच्छा दिल्यात.

मराठी जनतेला मराठीतून अभिवादन

आपल्या भाषणाची सुरूवात करताना ममता बॅनर्जी यांनी मराठीतून संवाद साधला. “महाराष्ट्रातील सर्व प्रबुद्ध जनतेला माझे अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा!”, असे त्या म्हणाल्या. त्यावेळी सभागृहातील उपस्थितांनी एकच टाळ्यांचा कडकडाट केल्या. गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी देशातील राज्यांच्या दौऱ्यावर असून अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी मंगळवारी सिद्धीविनायकाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव ममता बॅनर्जींना भेटू शकले नाहीत. दरम्यान यावेळी चर्चेदरम्यान त्यांनी उद्धव उद्धव ठाकरे लवकरात लवकर बरे व्हावेत आणि राष्ट्रीय राजकारणत सक्रीय व्हावेत यासाठी सिद्धिविनायकाकडे प्रार्थना केल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी, ममता बॅनर्जी या शरद पवारांची भेट घेणार आहेत. तर आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीदेखील भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – ममता बॅनर्जी शरद पवारांची घेणार भेट?)

या राज्यात ममता बॅनर्जी लढणार निवडणूक!

ममता बॅनर्जी त्यांच्या टीएमसी पक्षाची व्याप्ती राष्ट्रीय स्तरावर वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दिशेने पाऊल टाकत त्या गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांचा दौरा करत आहे. यादरम्यान त्या राजकारण्यांना भेटून त्यांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई दौऱ्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ममता बॅनर्जी या राजस्थान दौऱ्यावरही जाणार आहेत. या दौऱ्यात राजस्थानमधील पक्षाची ताकद वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. गोवा, मेघालय, त्रिपुरा आणि आसाममध्येही निवडणुकीत लढण्याचा निर्णय ममता बॅनर्जींनी घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.