मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ‘या’ तीन महत्त्वाच्या घोषणा

176
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 'या' तीन महत्त्वाच्या घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 'या' तीन महत्त्वाच्या घोषणा

विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सावंतवाडी येथील सभेत बोलताना तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. पर्यटनाला चालना देण्यासाठी आंबोलीत नवीन हिल स्टेशन उभारणार, मुंबई-गोवा महामार्गाला चालना देण्यात येणार आणि चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्यात येणार अशा तीन घोषणा मुख्यमंत्री शिंदे केल्या.

कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच असा’ असा पाहुणचार करणाऱ्या कोकणाचा सर्वांगिण विकास करण्यावर भर आहे. त्याचबरोबर राज्यातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक प्रकल्प राज्यात सुरु आहेत. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प सुरु असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सावंतवाडी शहर व सावंतवाडी मतदार संघातील विविध ११० कोटी रुपये विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, ग्रामविकास व क्रीडामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार रविंद्र फाटक, आमदार भरत गोगावले, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, युवराज लखमराजे सावंत-भोसले, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रातांधिकारी प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते. यावेळेस मुख्यमंत्री शिंदे महाविकास आघाडीला टोला लगावत बोलले की, मागील सरकारच्या काळात अनेक प्रकल्प थांबविण्यात आले होते. आम्ही सत्तेवर आल्यानंतर सर्व प्रकल्पांना गती दिली आहे. यापूर्वी कोणत्याही सरकारने एवढा निधी दिला नसेल, तेवढा निधी सिंधुदुर्गला दिला आहे.

(हेही वाचा – Energy Project : कोकणात उभारणार ४ जलविद्युत निर्मिती प्रकल्प; ४४ हजार कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षरी )

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोकणात पर्यटन वाढीसाठी सर्वकाही करण्याची राज्य सरकार तयारी आहे. कोकणात निसर्ग संपन्नता आहे. त्यामुळे पर्यटनवाढीला लागणार निधी राज्य सरकारकडून कमी पडणार नाही. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या लघु सूक्ष्म मंत्रालयाकडे असलेल्या सर्व योजना आपण घेण्यास कमी पडणार आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी हा महत्त्वाचा जिल्हा असून येथील व्यापारी, कारगिरांना सुविधा देण्यात येतील. तसेच इथल्या विकासकामांना गती देण्यासाठीही ११० कोटींचा भरघोस निधी देण्यात आला आहे. शिवाय राज्य सरकारचे महिला गटांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असून खेळाडूंना वाव देण्यासाठी कोकणात तीन क्रीडा संकुल बांधण्यात येतील, असे आश्वासन शिंदेंनी यावेळी दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.