पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात होणार ‘हे’ महत्वाचे करार

135
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात होणार महत्वाचे करार
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात होणार महत्वाचे करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या या महिन्यातील प्रस्तावित दौऱ्याला संस्मरणीय बनवण्यासाठी दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची पथके कामाला लागली आहेत. न्यूयाॅर्कमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभागी होत जगाचे नेतृत्व करणे, अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्राला मार्गदर्शन करण्याच्या ऐतिहासिक संधीसह सामरिक दृष्टिकोनातून मोदींचा दौरा देशभरातील जनतेसाठी अभिमानाची बाब ठरणार आहे.

यामुळे संरक्षण क्षेत्रात ठोस पावले उचलण्याची तयारी सुरू आहे. भारतात ३५० फायटर जेट इंजिनांच्या निर्मितीचा महत्त्वपूर्ण सौदा या दौऱ्यात होऊ शकतो. अमेरिकी कंपनी जनरल इलेक्ट्रिक (जीई), हिंदुस्तान एअरोनॉटिक्स यांच्यात समझोत्यावर २२-२३ जूनला सह्या होण्याची शक्यता आहे. कराराला अंतिम रूप देण्यासाठी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन दिल्लीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत.

हा करार भारताच्या फायटर कार्यक्रमासाठी महत्त्वाचा आहे. तेजस या स्वदेशी हलक्या लढाऊ विमानात कमी शक्तीचे जीई इंजिन असते. आधी ८३ तेजसमध्ये हेच इंजिन बसवण्यात आले. मार्क-२ आणि पाचव्या पिढीच्या स्वदेशी फायटर एमकामध्ये जीई-४१४ इंजिन असेल. १९६३ नंतर वापरात असलेली रशियन मिग फायटर पुढील ३ वर्षांत निवृत्त होतील. त्यानंतर अमेरिकी इंजिन असलेली लढाऊ विमाने सज्ज होतील. तिकडे, तेजसमध्ये जीई इंजिन विश्वसनीय ठरले आहे. २००१ मध्ये पहिल्या उड्डाणानंतर इंजिन फेल होण्याचा एकही प्रकार घडलेला नाही. इंजिनांची निर्मिती तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे होईल. यासाठी अमेरिकेने भारताला नाटो प्लसचा दर्जा दिला.

(हेही वाचा – काँग्रेसच्या हट्टापुढे नितीश कुमार नरमले; विरोधी पक्षांची बैठक आता २३ जूनला)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यानच ३० एमक्यू-९ बी सशस्त्र ड्रोन खरेदी व्यवहार होण्याचीही शक्यता आहे. हा व्यवहार जवळपास २२ हजार कोटी रुपयांचा असू शकतो. असे १० ड्रोन लष्कराच्या तिन्ही दलांना मिळतील. जवळपास २ टन सैन्य-साहित्य वाहून नेण्यासाठी सक्षम असलेले हे ड्रोन सलग ४८ तास उड्डाण भरत ६००० किमी रेंजमध्ये ऑपरेशन करू शकतात. सेन्सर, लेझर गाइडेड बॉम्बसह या ड्रोनमध्ये हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रेही असतील. बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प, जो बायडेन या तीन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा पाहुणचार घेणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

अवकाश, ऊर्जा आणि व्यापार करारांना गती देण्यासाठी अमेरिका-इंडिया बिझनेस कौन्सिलने १२ आणि १३ जून रोजी दिल्लीत आयडिया शिखर परिषद आयोजित केली आहे. त्यात दोन्ही देशांतील २०० पेक्षा अधिक कंपन्यांचे उच्च पातळीवरील प्रतिनिधी सहभागी होतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.