आगामी निवडणुकीचे नेतृत्व आता भाजपच्या यंग ब्रिगेडच्या हाती

79

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने आतापासूनच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीचे नेतृत्व आता भाजप यंग ब्रिगेडच्या हाती देण्याच्या विचारात आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील दोन लोकसभा आणि जास्तीत जास्त विधानसभेच्या जागा तसेच महापालिका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी आमदार सचिन कल्याशेट्टी, आमदार राम सातपुते यांच्यासह उदय पाटील, मनीष देशमुख, किरण देशमुख यांच्यावर आगामी काळात मोठी जबाबदारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही यंग ब्रिगेड भाजपला संपूर्ण जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करून देणार का याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी  लोकसभेसाठीचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याचे समोर आले होते. राज्यात ४८ लोकसभेसाठी जागा आहेत. यापैकी २१ जागा ठाकरे गट, १९ जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि ८ जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती समोर आली होती. यातील मुंबईतील ६ पैकी ४ जागा ठाकरे गट लढविणार असल्याचे सांगितले गेले होते. पण ५ ते ६ जागा अशा आहेत, ज्यावर मविआमध्ये पूर्ण सहमती झालेली नसल्याची माहिती मिळाली होती.

(हेही वाचा – २०२४ लोकसभा निवडणुकीची भाजपची ‘ब्लू प्रिंट’ तयार; मोदींच्या १०० सभा, तर मोठ्या प्रकल्पांची होणार घोषणा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.