‘मोदींसारखा दुसरा नेता देशात नाही’; अजित पवार यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

146
'मोदींसारखा दुसरा नेता देशात नाही'; अजित पवार यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज म्हणजेच शनिवार १५ जुलै रोजी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलतांना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

“गेल्या नऊ वर्षांपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक कामे होत आहेत. त्यामुळे देशातच नव्हे तर जगभरात नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत. सरकारमध्ये असल्याशिवाय राज्यातील प्रश्न सोडविणे शक्य होणार नाही असं सांगत पीएम नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नाही” असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवार यांनी सकाळी वंदे भारत एक्सप्रेसमधून नाशिक पर्यंतचा प्रवास केला. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले. त्यांनतर शासकीय विश्रामगृहात अजित यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला त्यांनी राज्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याचे सांगत पेरण्या नगण्य झाल्या असून काही ठिकाणी दुबार पेरणीचे (Crop Sowing) संकट आहे. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही तिघे आढावा घेत असल्याचे सांगितले.

(हेही वाचा – हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के)

लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार…

तसेच अजित पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. राज्याचा विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो असून आम्ही एक परिवार म्हणून काम करत आहोत. केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून राज्यातील प्रश्न सोडविता येणार आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून देशात पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. अनेक कामे होत आहेत, अनेक प्रकल्प राज्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आहे, तो नाकारता येणार नाही.

वंदे भारत एक्सप्रेसने येत असताना अनेक लोकांशी चर्चा केली. रेल्वेतील अनेक लोक साई दर्शनासाठी जात होते. वंदे भारत रेल्वेची सर्व्हिस चांगली आहे. अशा सुविधा लोकांना दिल्या पाहिजे, लोकांच्या मूलभूत गरजा लोकांपर्यंत पोहचविल्या पाहिजे. त्यामुळे देशातच नव्हे जगभरात नरेंद्र मोदींचा करिष्मा असून नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नसल्याचे सांगत केंद्र सरकारकडून अधिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.