Eknath Khadse : रावेरमध्ये नणंद-भावजय लढत होणार का; काय म्हणाले एकनाथ खडसे ?

भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांना घरातून आव्हान मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. रावेरची जागा राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे आहे. पवारांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची बैठक घेतली. उद्यापर्यंत उमेदवार ठरवण्यात येईल अशी माहिती खडसेंनी दिली.

161
Lok Sabha Election 2024 : खडसेंच्या भाजपा एन्ट्रीमध्ये ओबीसी कार्डचे गणित

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपाकडून महाराष्ट्रातील २० जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये रावेरची जागा शरद पवार गटाकडे असल्याने रावेरमध्ये रोहिणी खडसे किंवा एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळू शकते अशा चर्चा सुरू होत्या. त्यामुळे रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे अशी लढत होणार असल्याचे बोलले जात होतं मात्र या चर्चांवर एकनाथ खडसे यांनी पूर्णविराम दिला असून तब्येतीचा हवाला देत स्वतः निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Eknath Khadse)

(हेही वाचा – Major Sandeep Unnikrishnan : मुंबईवरील हल्ल्यात अतुलनीय शौर्य गाजवलेले हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन)

नक्की काय म्हणाले खडसे…

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांना भेटल्यानंतर माध्यमांची बोलताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सांगितले की, रोहिणी खडसे या मतदारसंघात काम करत आहेत मात्र त्या लोकसभेच्या उमेदवार नाहीत. रावेरची जागा राष्ट्रवादीकडेच आहे तसेच सात-आठ उमेदवार इच्छुक आहेत. त्या उमेदवारांची शरद पवारांसोबत बैठक झाली. त्यांची माहिती घेण्यात आली. त्यातील एका उमेदवाराची निवड उद्या होण्याची शक्यता आहे. तसेच मी देखील या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही कारण प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांनी मला तसा सल्ला दिला असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. (Eknath Khadse)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या लोकसभेसाठी इच्छुक नाही तर त्यांनी मुक्ताईनगर विधानसभेसाठी तयारी केली आहे. तसेच यावेळी खडसे यांना विचारण्यात आलं की, जर खडसे कुटुंबातील उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात नसेल तर भाजपासाठी ही निवडणूक सोपी होईल का? यावर बोलताना खडसे (Eknath Khadse) म्हणाले की, राष्ट्रवादीचा जो उमेदवार या मतदार संघातून उभा असेल. त्यांच्यात चुरशीचा सामना होईल. तसेच त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच विजय होईल. असा ठाम विश्वास यावेळी खडसे यांनी व्यक्त केला. (Eknath Khadse)

यामुळे आता भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांना घरातून आव्हान मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. रावेरची जागा राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे आहे. पवारांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची बैठक घेतली. उद्यापर्यंत उमेदवार ठरवण्यात येईल अशी माहिती खडसेंनी दिली. (Eknath Khadse)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.